अल्पवयीन मुलगी पडली प्लंबरच्या प्रेमात, पोलिसांनी अटक केली तर म्हणाले - आता जे होईल...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2022 15:31 IST2022-12-06T15:30:48+5:302022-12-06T15:31:20+5:30
Bihar : मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोन वर्षाआधी अल्पवयीन मुलगी तिच्याच परिसरात राहत असलेल्या रविशंकर प्रसादचा मुलगा प्लंबर ऋतिक कुमारच्या प्रेमात पडली.

अल्पवयीन मुलगी पडली प्लंबरच्या प्रेमात, पोलिसांनी अटक केली तर म्हणाले - आता जे होईल...
Shocking News: आजकाल अशा अनेक घटना समोर येत असतात ज्यांवर सहजासहजी विश्वास ठेवणं अवघड होतं. अशीच एक धक्कादायक घटना बिहारमधून समोर आली आहे. नवादा बुदेंलखंडमधील एक अल्पवयीन मुलगी प्लंबरसोबत फरार झाली. ज्यानंतर मुलीच्या वडिलांनी मुलीचं अपहरण झाल्याची तक्रार पोलिसांकडे दिली. त्यानंतर पोलिसांनी या जोडप्याला अटक केली.
धक्कादायक बाब म्हणजे अल्पवयीन मुलगी 4 महिन्यांची गर्भवती असल्याचं सांगितलं जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोन वर्षाआधी अल्पवयीन मुलगी तिच्याच परिसरात राहत असलेल्या रविशंकर प्रसादचा मुलगा प्लंबर ऋतिक कुमारच्या प्रेमात पडली. दोघेही साधारण दोन वर्ष फोनवर बोलत होते. यादरम्यान दोघांचं प्रेम चांगलंच फुललं होतं. दोघांनी सोबत जगण्या-मरणाची शपथही घेतली होती. त्यानंतर 8 महिन्यांआधी दोघांनी घरातून पळून जाऊन लग्न केलं.
मिळालेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलगी 4 महिन्यांची गर्भवती आहे. दोघेही म्हणाले की, आता काहीही झालं तरी चालेल, पण ते दोघेही सोबत राहतील. पोलिसांनी सांगितलं की, तरूणाला अपहरणाच्या केसमध्ये अटक केली आहे. पुढील कारवाई सुरू आहे.