बाप रे बाप! इथे इतका मोठा खजिना सापडला होता की, लोक सोनं देऊन धान्य अन् वस्तू खरेदी करायचे!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2021 02:10 PM2021-01-25T14:10:26+5:302021-01-25T14:17:50+5:30

खजिना मिळाल्यावर सॅन फ्रान्सिस्कोमध्ये लोकांचा जसा महापूर आला होता. लोक यथे नदी आणि समुद्रामार्गे पोहोचत होते.

Mill worker found gold on 24 january 1848 in California us california gold rush James W Marshall | बाप रे बाप! इथे इतका मोठा खजिना सापडला होता की, लोक सोनं देऊन धान्य अन् वस्तू खरेदी करायचे!

बाप रे बाप! इथे इतका मोठा खजिना सापडला होता की, लोक सोनं देऊन धान्य अन् वस्तू खरेदी करायचे!

Next

प्रमाणापेक्षा जास्त धनाची समृद्धी अनेकदा अडचणीची ठरते. असंच अमेरिकेतील कॅलिफोर्नियाच्या फ्रान्सिस्को शहरात घडलं. इथे एका मीलमध्ये काम करणाऱ्या मजूराला मोठा खजिना सापडला. ज्यानंतर या छोट्या भागाचं चित्रच बदललं. सोनं मिळवण्याच्या अपेक्षेने लोक इथे बाहेरून येऊ लागले आणि स्थानिक लोकांचं जगणं अवघड झालं होतं. 

खजिना मिळाल्यावर सॅन फ्रान्सिस्कोमध्ये लोकांचा जसा महापूर आला होता. लोक यथे नदी आणि समुद्रामार्गे पोहोचत होते. जेव्हा सॅन फ्रान्सिस्कोमध्ये लोकांना राहण्यासाठी घरे कमी पडू लागली तेव्हा लोक टेंट लावून राहू लागले होते. सोबतच लाकडाची तात्पुरती घरेही तयार केली होती.

कॅलिफोर्नियामध्ये अनेक जहाजे येऊन धडकली होती. सॅन फ्रान्सिस्कोमध्ये गर्दी इतकी जास्त वाढली होती की, बाहेरील लोकांनी खाण्या-पिण्याच्या वस्तू विकण्याचं काम सुरू केलं होतं. नंतर लोक इथे सोन्याच्या बदल्यात धान्य खरेदी करू लागले होते.

खजिना कसा मिळाला?

सॅन फ्रान्सिकोमध्ये ही घटना होऊन दीडशेपेक्षा जास्त वर्षे झालीत. इथे मीलमध्ये काम करणाऱ्या जेम्स डब्ल्यू मार्शल या मजुराला २४ जानेवारी १८४८ ला अचानक अब्जो रूपयांचं सोनं सापडलं होतं. त्याला मिलमधील एका पानचक्कीजवळ सोन्याचा तुकडा मिळाला होता. ही बाब  त्याने लगेच जाऊन मालकाला सांगितली. मालक ही बातमी ऐकून अवाक् झाला. मालकाने त्याला सांगितले की, कुणालाही सोन्याबाबत सांगू नकोस.

मात्र, खजिना मिळाल्याची इतकी मोठी बातमी कशी लपणार होती. सुरूवातीला अफवा म्हणून एका स्थानिक न्यूजपेपरने ही बातमी छापली. नंतर न्यूजपेपरच्या मालकानेच सोनं विकण्यासाठी स्वत:चं दुकान टाकलं. नंतर आणखी एका दुसऱ्या न्यूजपेपरने ही बातमी झापली तर ही बातमी आगीसारखी जगभरात लगेच पसरली. 

दरम्यान अब्जो रूपयांचा खजिना मिळण्याआधी सॅन फ्रान्सिस्कोमध्ये जवळपास १ हजार लोक राहत होते. पण खजिना मिळाल्यावर येथील लोकसंख्या २५ हजारांपेक्षा जास्त झाली. त्यावेळी प्रत्येकाला इथे यायचं होतं. खजिना मिळाल्यावर सुरूवातीला २ वर्षे सॅन फ्रान्सिस्कोमध्ये सोन्याची देवाण-घेवाण करणं सोपं होतं. पण शहरात बाहेरील लोकांची संख्या वाढल्यावर त्यांचा स्थानिकांशी संघर्ष सुरू झाला होता. यादरम्यान १६००० पेक्षा जास्त स्थानिक लोकांची हत्या करण्यात आली होती.

या स्थितीशी निपटण्यासाठी सरकारने टॅक्स लावणं सुरू केलं. आजपासून साधारण १५० वर्षाआधी लावण्यात आलेला टॅक्स २० डॉलर प्रति महिन्याहून वाढून आता २०२१ मध्ये ६१० डॉलर प्रति महिना झाला आहे. लोकांचा जीव घेऊनच इथे अब्जो डॉलरचं सोनं जमिनीतून काढण्यात आलं आहे.
 

Web Title: Mill worker found gold on 24 january 1848 in California us california gold rush James W Marshall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.