काय सांगता? १८० वर्ष जगण्यासाठी हा माणूस करतोय भलताच जुगाड; आतापर्यंत खर्च केले इतके पैसै
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2021 13:04 IST2021-02-03T12:53:44+5:302021-02-03T13:04:29+5:30
जर तुम्ही वेळोवेळी उपवास करत असाल तर हे करणं तुमच्यासाठी सहज शक्य आहे. यामुळे वजन कमी होईल आणि तुम्ही जास्त हेल्दी आणि फिट राहाल.

काय सांगता? १८० वर्ष जगण्यासाठी हा माणूस करतोय भलताच जुगाड; आतापर्यंत खर्च केले इतके पैसै
जास्त जगणं आणि आयुष्याचा आनंद घेणं सगळ्यांनाच आवडत असतं. पण प्रत्येकालाच एका मर्यादेनंतर जगाचा निरोप घ्यावा लागतो. सध्या सोशल मीडियावर एक अनपेक्षित प्रकार समोर आला आहे. मिलियेनर नावाची एक व्यक्ती स्वतः बायोहॅकर ठरली आहे. त्यांनी सांगितले की, ''मी स्वतः १८० वर्ष जगणार आहे.'' हे ऐकल्यानंतर सगळेचजण अवाक् झाले आहेत.
७ कोटी रुपये खर्च केले होते
या माणसाचं नाव डेव एस्प्रे आहे. इंडिया टाईम्सनं दिलेल्या माहितीनुसार हा माणूस सध्या तरूण असून या माणसानं १०००००० डॉलर म्हणजेच भारतीय चलनाप्रमाणे ७ कोटी रुपये खर्च केले आहेत. अलिकडेच त्यांनी Holly Willoughby आणि Philip Schofield शी बोलताना सांगितले की, ''मला १८० वर्षांपर्यंत जगण्याची इच्छा आहे. त्यासाठी मी वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न करतो.''
हा आहे मार्ग
डेव यांनी सांगितले की, ''ब्रेकफास्ट टाळणं गरजेचं आहे. जर तुम्ही वेळोवेळी उपवास करत असाल तर हे करणं तुमच्यासाठी सहज शक्य आहे. यामुळे वजन कमी होईल आणि तुम्ही जास्त हेल्दी आणि फिट राहाल. दीर्घायुष्यासाठी रात्रीचं जेवणसुद्धा खूप महत्वाचं आहे. रात्रीचं जेवण हे जितक्या लवकर शक्य आहे तितक्या लवकर घ्यायला हवं. झोपण्याच्या एक तास आधी जेवण करा. त्यामुळे तुमचं शरीर चांगलं राहण्यास मदत होईल.
बोंबला! गर्लफ्रेंडनं बॉयफ्रेंडला दिली घराची ड्यूपलिकेट चाबी; १३ लाखांची चोरी करून गेला पळून
मला १८० वर्षांपर्यंत जगायचं आहे. यासाठी वेळोवेळी उपवास ठेवायला हवेत. याशिवाय एक सायकल मेंटेंन केलेली असावी. जेणेकरून एक नियम तयार केला जाईल. याला क्रियोथेरेपी किंवा कोल्ड थेरेपी म्हटलं जातं. याशिवाय दीर्घायुष्यासाठी शांत झोपही आवश्यक असते. ''
काय सांगता? ८ वर्षात ११६ मुलांचा पिता बनला; फेसबुकवर महिला करताहेत आई बनण्यासाठी विनंती
लोकांकडून यासंबंधी अनेक प्रश्नसुद्धा विचारण्यात आले होते. डेव यांचे मत विचारात घेतलं आहे. एका युजरनं सांगितलं नाष्ता हा एनर्जी देण्यासाठी चांगला असतो. डेवचा हा दीर्घायुष्याचा फंडा कितपत काम करतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. लोकांच्या मनात डेवच्या आयुष्याबाबत खूप उत्सुकता आहे. कारण असा दावा करणारी ही पहिलीच व्यक्ती असावी.