बोंबला! गर्लफ्रेंडनं बॉयफ्रेंडला दिली घराची ड्यूपलिकेट चाबी; १३ लाखांची चोरी करून गेला पळून

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2021 08:13 PM2021-02-02T20:13:25+5:302021-02-02T20:20:28+5:30

बॉयफ्रेंडला सगळं सांगण्याची मोठी किंमत एका मुलीला मोजावी लागली आहे. गर्लफ्रेंडनं फ्लॅटची चावी दिल्यानंतर या माणसानं  १३ लाख  रुपयांच्या सामानाची चोरी केली आहे.

Shocking news mumbai girl gives duplicate house keys to boyfriend and he robs 13 lakh rupees | बोंबला! गर्लफ्रेंडनं बॉयफ्रेंडला दिली घराची ड्यूपलिकेट चाबी; १३ लाखांची चोरी करून गेला पळून

बोंबला! गर्लफ्रेंडनं बॉयफ्रेंडला दिली घराची ड्यूपलिकेट चाबी; १३ लाखांची चोरी करून गेला पळून

Next

प्रेमात आणि युद्धात सगळं  काही माफ असतं. असं म्हटलं जातं. पण एका मुलीला प्रेम करण्याची मोठी किंमत मोजावी लागली आहे. गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड आपल्या सगळ्याच  गोष्टी एकमेकांसह शेअर करत असतात. तुम्हाला कल्पना नसेल बॉयफ्रेंडला सगळं सांगण्याची मोठी किंमत एका मुलीला मोजावी लागली आहे. गर्लफ्रेंडनं फ्लॅटची चावी दिल्यानंतर या माणसानं  १३ लाख  रुपयांच्या सामानाची चोरी केली आहे.

इंडिया टाईम्सनं दिलेल्या माहितीनुसार ही घटना घडली तेव्हा ही मुलगी घरात नव्हती. आपल्या कुटुंबियांसह एका ट्रिपला गेली होती.  तिनं आधी घराची डुप्लीकेट चाबी आपल्या बॉयफ्रेंडला दिली होती कारण तिला आपल्या बॉयफ्रेंडसोबत वेळ घालवायचा होता. म्हणून तिनं चावी दिली होती. पण वडीलांनी काहीच ऐकलं नाही  तिला सोबत घेऊन गेले. २७ जानेवारील जेव्हा ते लोक परत आले तेव्हा  या मुलीसह संपूर्ण कुटुंब चकीत झाले. 

याला म्हणतात कर्माची फळं! बंदूकीनं चिमणीवर लावला निशाणा अन् पंखांवर गोळी लागताच झालं असं काही

समोर आलेल्या माहितीनुसार बॉयफ्रेंडनं १३ लाख रूपयांपर्यंत सामानाची चोरी केली.  रिपोर्टनुसार ही तक्रार कुलाबा पोलिस स्थानकात दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या मुलानं कोणत्याही प्रकारची तोडफोड केलेली नाही. मुलीने पोलिसांना सांगितले की तिच्या बॉयफ्रेडला चावी दिली होती. त्यानंतर या तरूणाची चोरी पकडली गेली आणि संपूर्ण प्रकार समोर आला आहे. काय सांगता? ८ वर्षात ११६ मुलांचा पिता बनला; फेसबुकवर महिला करताहेत आई बनण्यासाठी विनंती

Web Title: Shocking news mumbai girl gives duplicate house keys to boyfriend and he robs 13 lakh rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.