हे जग काही आश्चर्यकारक तर काही विचित्र गोष्टींनी भरलेलं आहे. जगात असे अनेक लोक आहेत, जे त्यांच्या वेगळेपणासाठी ओळखले जाते. जसे की, कुणाची उंची जास्त आहे तर कुणाची नखे लांब आहेत. असे वेगळेपण असलेले लोक जगभरात चर्चेत राहतात. पण तुम्हाला जगातली सर्वात उंच पाय असलेली तरूणी माहीत आहे का? नसेल तर आम्ही तुम्हाला या तरूणीची ओळख करून देणार आहोत.

रशिया एकेटेरिना लिसिनाच्या नावावर जगातली सर्वात लांब पाय असलेली तरूणीचा हा वर्ल्ड रेकॉर्ड आहे. इतकेच नाही तर एकेटेरिनाच्या नावावर गिनीज बुकमध्येही रेकॉर्ड नोंदवला गेला आहे.  

२९ वर्षाची एकेटेरिना व्यवसायाने एक मॉडल आहे. तसेच तिला जगातली सर्वात उंच मॉडेलचा किताबही देण्यात आला आहे. एकेटेरिनाची उंची ६ फूट ९ इंच इतकी आहे. तर तिच्या डाव्या पायाची लांबी १३२.८ सेमी आणि उजव्या पायाची लांबी १३२.२ सेमी इतकी आहे.

तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, एकेटेरिना लिसिना एका अशा घरातील आहे ज्या घरात सगळेच उंच आहेत. तिच्या भावाची उंची ६ फूट ६ इंच, वडिलांची उंची ६ फूट ५ इंच आणि आईची उंची ६ फूट १ इंच इतकी आहे.

लिसिनाला तिच्या उंचीमुळे अनेक अडचणींचा सामनाही करावा लागतो. तिला विमानात किंवा कारमध्ये बसताना अडचण येते. त्यासोबतच ना तिच्या साइजचे पॅन्ट मिळतात ना शूज. तिला तिच्यासाठी सगळं स्पेशल तयार करून घ्यावं लागतं.

एकेटेरिना आधी बास्केटबॉल खेळायची. रशियाच्या नॅशनल टीमकडून खेळताना २००८ च्या बीजिंग ऑलम्पिकमध्ये तिने रशियासाठी कांस्य पदक जिंकले होते.

तसेच आणखी एका आश्चर्याची बाब म्हणजे एकेटेरिना हिंदू धर्माचं पालन करते. काही वर्षांपूर्वी तिने हिंदू धर्म स्वीकारला होता. देवी लक्ष्मीची भक्त आहे. हिंदू धर्ण स्विकारल्यापासूनच तिने मांसाहार बंद केलाय.


Web Title: Meet the 6 feet 9 inch Russian model with the world’s longest legs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.