(Image Credit : Hindustan)(प्रतिकात्मक फोटो)
आपण अनेकदा अशा बातम्या वाचल्या असतील ज्यात मुलं प्रेयसीसाठी महागडे गिफ्ट घेण्यासाठी चोरी करताना पकडले गेले. अनेकदा तर अनेक गुन्हेगारांनी गुन्हेगारीच्या दलदलीत अडण्याला प्रेम जबाबदार असल्याचंही म्हटलं आहे. पण यूपीच्या मेरठमध्ये याच्या उलट एक घटना समोर आली आहे. इथे एक तरूणी तिच्या बॉयफ्रेन्डवर पैसे खर्च करण्यासाठी चोर झाली.
हिंदुस्थान डॉट कॉमने दिलेल्या रिपोर्टनुसार, ही तरूणी मेरठच्या गोविंद प्लाझा येथील एका फायनान्स कंपनी ऑफिसमध्ये काम करत होती. दोन महिन्यांपूर्वी या ऑफिसमध्ये तिला असिस्टंट पदावर नोकरी देण्यात आली होती. आणि जेव्हापासून या ऑफिसमध्ये ती जॉइन झाली तेव्हापासूनच ऑफिसच्या सेफमधून रक्कम गायब होत होती.
फायनान्स कंपनीचे मालक लक्की सेठने रविवारी काही रोख रक्कम सेफमध्ये ठेवली होती. पण काही तासांनी त्यांनी ती रक्कम मोजली तर त्यात ४५०० रूपये कमी आढळले. त्यांनी असिस्टंटला विचारपूस केली तर ती काही बरोबर उत्तर देऊ शकली नाही. हा पैसे गायब होण्याचा प्रकार दोन महिन्यांपासूनच सुरू होता. त्यामुळे पोलिसांना बोलवण्यात आलं.
पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तरूणीला ताब्यात घेतलं. विचारपूस केल्यावर तरूणीने कबूल केलं की, तिने सेफची एक डुप्लिकेट चावी तयार करून ठेवली होती. तरूणीने सांगितले की, मालक ऑफिसमधून बाहेर गेले की, ती सेफमधून पैसे चोरी करत होती. अशाप्रकारे दोन महिन्यात तिने पावणे दोन लाख रूपयांची चोरी केली.
पोलिसांनी आणखी विचारपूस केल्यावर तिने सांगितले की, ती ही रक्कम तिच्या बॉयफ्रेन्डवर खर्च करत होती. इतकेच नाही तर सेफची चावी सुद्धा तिने तिच्या बॉयफ्रेन्डच्या मदतीने तयार केली होती. पोलिसांनी तरूणीवर गुन्हा दाखल करून घेतला आहे.