शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
2
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
3
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
4
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
5
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
6
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
7
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
8
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
9
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
10
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
11
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
12
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
13
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
14
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
15
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
16
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
17
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
18
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
19
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
20
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर

रस्त्यावर किलोमीटरचे दगड का असतात विशिष्ट रंगानी रंगवलेले? जाणून घ्या रंजक कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2022 4:38 PM

किलोमीटरचे आकडे दाखवणाऱ्या दगडांचा वरचा भाग वेगवेगळ्या रंगाने रंगवण्याला एक विशेष अर्थ आहे. चला तर जाणून घेऊयात कोणत्या रंगाच्या दगडाचा काय अर्थ असतो.

एखाद्या रस्त्यावरून (road) प्रवास ( traveling ) करताना रस्त्याच्या कडेला किलोमीटरचे (kilometers) आकडे दाखवण्यासाठी लावलेले दगड (stones) आपलं लक्ष्य वेधून घेतात. तुम्हाला माहिती आहे का, प्रवासाला जाताना या दगडांच्या रंगांवरून ( colors ) अंतरासोबत रस्त्याचा अंदाज बांधता येऊ शकतो. या दगडांना मैलाचे दगड म्हणतात. शहराचे नाव आणि अंतर दर्शवलेल्या या दगडांचे रंग वेगवेगळे का ? निळा, पिवळा, हिरवा, नारंगी अशा वेगवेगळ्या रंगांनी ( different colors ) या दगडांचे शेंडे का रंगवलेले जातात ? असे अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतील. किलोमीटरचे आकडे दाखवण्यासाठी असणारे हे दगड रंगवण्यामागे खास कारणं आहे. हा प्रत्येक रंग काहीतरी सांगत असतो.

किलोमीटरचे आकडे दाखवणाऱ्या दगडांचा वरचा भाग वेगवेगळ्या रंगाने रंगवण्याला एक विशेष अर्थ आहे. चला तर जाणून घेऊयात कोणत्या रंगाच्या दगडाचा काय अर्थ असतो.

हिरवी पट्टी असलेले माइलस्टोन (Green Milestones)- हिरवा-पांढऱ्या रंगाचा मैलाच्या दगडाचा अर्थ असा होतो की, तुम्ही राज्य महामार्गावरून प्रवास करत आहात. हे रस्त राज्यातील विविध शहरांना एकमेकांशी जोडतात. 2016 च्या आकडेवारीनुसार, भारतातील राज्य महामार्गाचे जाळे 1 लाख 76 हजार 166 किलोमीटर पसरलेले आहे.

काळी किंवा निळी पट्टी असलेले माइलस्टोन्स (Black or Blue & White Strips)- प्रवासादरम्यान निळ्या आणि पांढऱ्या किंवा काळ्या आणि पांढऱ्या रंगाचा दगड दिसल्यास तुम्ही एखाद्या शहरी किंवा जिल्हा मार्गावर आहात, असं समजावं. भारतात अशा रस्त्यांचे जाळे 5 लाख 61 हजार 940 किमी आहे.

पिवळ्या रंगाची पट्टी असलेले माइलस्टोन्स (Yellow Strips)- पिवळा-पांढऱ्या रंगाचा मैलाचा दगड राष्ट्रीय महामार्ग दर्शवण्यासाठी वापरला जातो. जेव्हा तुम्ही एका शहरातून दुसऱ्या शहरात किंवा एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाण्यासाठी राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करीत असाल, तेव्हा तुम्हाला अनेकदा मैलाच्या दगडावर फिकट पिवळे पट्टे दिसतील.नुकत्याच जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, भारतातील राष्ट्रीय महामार्ग 1 लाख 51 हजार 19 किमी आहे.

नारिंगी रंगाची पट्टी असलेले माइलस्टोन्स (Orange Strips)- अनेक वेळा रस्त्याच्या कडेला असलेल्या मैलाचा दगड हा नारंगी-पांढऱ्या रंगाचा असल्याचे दिसते.हा दगड पाहून तुम्ही ग्रामीण रस्त्यावरून प्रवास करीत आहात, हे समजू शकते. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, जवाहर रोजगार योजना आणि इतर योजनांच्या माध्यमातून गावांमध्ये बांधण्यात आलेल्या रस्त्यांवरील दगड नारिंगी- पांढऱ्या रंगाचे असतात. भारतातील ग्रामीण रस्त्यांचे जाळे सुमारे 3.93 लाख किमी आहे.

प्रवासा दरम्यान तुम्हाला रस्त्याच्या कडेला किलोमीटरचे आकडे दाखवण्यासाठी दगड दिसल्यास, त्या दगडाच्या रंगावरून तुम्ही सहज सांगू शकता की तुम्ही प्रवास करीत असणाऱ्या रस्त्याचा नेमका प्रकार कोणता आहे.

टॅग्स :Jara hatkeजरा हटके