याला म्हणतात नशीब! तिकीट न काढता लागली लॉटरी; घरबसल्या महिन्याला मिळतात 10 लाख
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2023 15:07 IST2023-08-11T14:59:57+5:302023-08-11T15:07:49+5:30
एक दिवस ते व्हॅनमध्ये बसून कॉफी पीत होते. याच दरम्यान काही मिनिटांत त्यांचे आयुष्य पूर्णपणे बदलून जाणार आहे यांची त्यांना कल्पनाही नव्हती.

फोटो - The National Lottery
कोणाचं नशीब कधी आणि कसं फळफळेल हे सांगता येत नाही. अशीच एक आश्चर्यकारक घटना आता समोर आली आहे. डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, जॉन स्टेम्ब्रिज नावाच्या 51 वर्षीय व्यक्तीसोबत असंच घडलं आहे. जॉन लोकांच्या घरांना प्लास्टर करण्याचे काम करायचे. त्यांच्याकडे राहण्यासाठी स्वत:चे घरही नव्हते. ते व्हॅनमध्ये राहायचे.
एक दिवस ते व्हॅनमध्ये बसून कॉफी पीत होते. याच दरम्यान काही मिनिटांत त्यांचे आयुष्य पूर्णपणे बदलून जाणार आहे याची त्यांना कल्पनाही नव्हती. जॉन यांनी सांगितलं की, ते दिवसभराचे काम संपवून व्हॅनमध्ये बसून कॉफी पीत होते. इतक्यात त्यांची नजर कारच्या विजरच्या मागे ठेवलेल्या तिकिटावर पडली. ते दुकान जवळच असल्याने त्य़ांनी ते चेक करण्याचा विचार केला.
स्टोअर असिस्टंटने ते तिकीट मशीनमध्ये घातलं तेव्हा एक विचित्र आवाज आला. त्यानंतर असिस्टंटने त्यांना तिकीट क्रमांकावर कॉल करण्यास सांगितलं कारण ते विनिंग तिकीट होतं. तेव्हाही जॉन यांना एक-दोन लाखांचे बक्षीस मिळेल असे वाटले पण मोठं बक्षीस मिळाल्याचं ऐकून त्याच्या डोळ्यात पाणी आलं.
नोकरी सोडली आणि फिरायला गेले
जॉन यांना मिळालेल्या तिकीटातून पुढील 30 वर्षांपर्यंत दर महिन्याला 10 लाख रुपये मिळतील, तेही करमुक्त. त्यांना विश्वास बसत नव्हता की, आता हे काम करण्याची गरज नाही, त्यांचे कुटुंबही आनंदाने जगू शकेल. वयाच्या 81 व्या वर्षापर्यंत दर महिन्याला ही रक्कम मिळणार असल्याने त्यांनी नोकरी सोडून आपला प्रवास करण्याचा छंद पूर्ण करणे योग्य मानले. फोटोग्राफीचा छंदही त्यांनी पुन्हा सुरू केला आणि स्वत:साठी एक लक्झरी कॅम्पर व्हॅनही खरेदी केली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.