बायकोसोबत भांडला अन् फळफळलं नशीब; क्षणार्धात झाला करोडपती; पैशाबाबत समजताच पत्नी बेशुद्ध
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2023 15:26 IST2023-03-15T15:17:34+5:302023-03-15T15:26:24+5:30
पत्नीसोबतच्या भांडणामुळे एका व्यक्तीचं नशीब फळफळलं आहे. त्याला क्षणार्धात कोट्यवधींची लॉटरी लागली आहे.

बायकोसोबत भांडला अन् फळफळलं नशीब; क्षणार्धात झाला करोडपती; पैशाबाबत समजताच पत्नी बेशुद्ध
कोणाचं नशीब कधी, कसं आणि कुठे फळफळेल हे सांगता येत नाही. काही लोक एका रात्रीत करोडपती होतात. अशीच एक अजब घटना आता समोर आली आहे. पत्नीसोबतच्या भांडणामुळे एका व्यक्तीचं नशीब फळफळलं आहे. त्याला क्षणार्धात कोट्यवधींची लॉटरी लागली आहे. सोशल मीडियावर या घटनेची जोरदार चर्चा रंगली आहे. पत्नीशी भांडण झाल्यानंतर एक व्यक्ती घराबाहेर पडला होता आणि तेव्हाच त्याला कोट्यवधी रुपये मिळाले आहेत.
पत्नीचा हे सर्व पाहून विश्वास बसेना. ती काही काळ बेशुद्ध पडली. metro.co.uk या वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना ऑस्ट्रेलियातील ओलोंगोंग येथील आहे. तिथे एका जोडप्याला 20 लाख डॉलर्स म्हणजेच 16 कोटी रुपयांहून अधिकची लॉटरी लागली आहे. पत्नी दर आठवड्याला लॉटरीचे तिकीट काढायची. तिला विश्वास होता की ती एक दिवस नक्कीच श्रीमंत होईल. वर्षानुवर्षे ती हे करत होती. एका आठवड्यात महिलेचा पती तिला लॉटरीचे तिकीट विकत घ्यायला विसरला.
तिकीट वरून दोघांमध्ये भांडण झाले. मग नवऱ्याने ठरवलं की पुढच्या आठवड्यात दोन तिकिटे काढायची. त्याने तेच केले. आपल्या पत्नीचे मन जिंकण्यासाठी पतीने त्याच क्रमांकासह लॉटरीची तिकिटे विकत घेतली जी त्याची पत्नी अनेक वर्षांपासून वापरत होती. एकाच दिवसात, या दोन्ही लॉटरीची तिकिटांवर एक एक मिलियन डॉलरची लॉटरी लागली. एवढी मोठी लॉटरी जिंकलेली पाहून बायको जवळजवळ बेशुद्धच झाली. महिलेच्या पतीचाही यावर विश्वास बसला नाही.
क्षणार्धात करोडपती बनलेल्या या जोडप्याने आता हे पैसे खर्च करण्यासाठी एक खास योजना आखली आहे. प्रथम ते आपल्या मुलीसाठी घर खरेदी करतील. यानंतर आपण नातवंडांसाठी काही पैसे जमा करू आणि नंतर वाचलेल्या पैशातून दोघेही सहलीला जाऊ असं ठरवलं आहे. महिला गेल्या अनेक वर्षांपासून समान क्रमांकाच्या लॉटरी खरेदी करत होती. ती जवळपास 20 वर्षांपासून लॉटरी खरेदी करत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"