याला म्हणतात नशीब; एकाच दिवशी दोन लॉटऱ्या जिंकून झाला 'इतक्या' संपत्तीचा मालक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2020 15:06 IST2020-04-30T15:04:11+5:302020-04-30T15:06:15+5:30

हा व्यक्ती जवळपास ३० वर्षांपासून लॉटरी नेहमी लावायचा.

Man who wins lottery not in once twice in the same day news from america myb | याला म्हणतात नशीब; एकाच दिवशी दोन लॉटऱ्या जिंकून झाला 'इतक्या' संपत्तीचा मालक

याला म्हणतात नशीब; एकाच दिवशी दोन लॉटऱ्या जिंकून झाला 'इतक्या' संपत्तीचा मालक

माणसाचं नशीब कधी बदलेल काही सांगता येत नाही, असं म्हणतात. अशीच एक घटना अमेरिकेत घडली आहे, तुमचा विश्वास बसणार नाही पण हे खरं आहे. अमेरिकेतील एका व्यक्तीला एकाच दिवसात दोन-दोन लॉटऱ्या लागल्या आहेत. दोन्ही लॉटरीचे पैसे मिळून या व्यक्तीने एकूण २ मिलियन डॉलर म्हणजे १५ कोटी कमावले आहेत.  जवळपास एकाच दिवसात १५ कोटी कमावले आहेत. 

या व्यक्तीचे नाव जॉय बी आहे.  हा व्यक्ती ३० वर्षांपासून लॉटरी नेहमी लावायचा. अमेरिकेतील कोलोराडो या ठिकाणचा रहिवासी असलेला व्यक्ती अमेरिकेत सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. हा व्यक्ती पॉवरबॉल जैकपॉट वर पैसे लावत होता. टाईम्सने दिलेल्या माहितीनुसार जॉय एकाच नंबरवर ३० वर्ष पैसे लावत होता. या व्यक्तीने एक तिकिट सकाळी खेरदी केलं तर दुसरं संध्याकाळी खरेदी केलं होतं.  ही दोन्ही तिकिटं या व्यक्तीने वेगवेगळ्या दुकानातून खरेदी केली होती. ( हे पण वाचा-बाटलीसाठी काही पण करु! सैन्याला हवी होती दारु; म्हणून युद्ध झाले सुरू)

सध्या  कोरोना व्हायरसमुळे सर्वत्र लॉकडाऊन आहे. लॉकडाऊनमुळे कोलोरेड लॉटरीच्या ऑफिसमध्ये जाऊन जॉय यांना भेट द्यावी लागणार आहे. त्यानंतर त्यांना मेलद्वारे लॉटरी जिंकल्याचा संदेश पाठवला जाईल. पण सतत ३० वर्ष एकाच नंबरवर लॉटरी लावत असल्यामुळे  हा व्यक्ती चर्चेचा विषय ठरला आहे. ( हे पण वाचा-लॉकडाऊनचे नियम पाळल्यास सोनं मिळणार; ग्राम पंचायतीची जबरदस्त ऑफर)

Web Title: Man who wins lottery not in once twice in the same day news from america myb