खोकला आला म्हणून डॉक्टरकडे गेला, एक्स-रे मध्ये जे दिसलं ते पाहून डॉक्टर 'कोमात'
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2023 13:04 IST2023-05-08T13:04:03+5:302023-05-08T13:04:18+5:30
Tapeworms In Human Body: एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीचा स्कॅन करण्यात आलं ज्यात त्याच्या पोटामध्ये खूपसारे कीटक दिसले.

खोकला आला म्हणून डॉक्टरकडे गेला, एक्स-रे मध्ये जे दिसलं ते पाहून डॉक्टर 'कोमात'
Tapeworms In Human Body: जगभरात रोज अशा अशा घटना समोर येतात ज्या वाचून हैराण व्हायला होतं. मेडिकल टेस्टच्या तर अशा अनेक घटना समोर येतात ज्या वाचून अंगावर काटा येतो. कुणी नाणी गिळतात तर कुणी लोखंडी नट-बोल्ट. या लोकांचे एक्स-रे नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीचा स्कॅन करण्यात आलं ज्यात त्याच्या पोटामध्ये खूपसारे कीटक दिसले.
रूग्णाच्या एक्स-रे मधून मोठा खुलासा
या व्यक्तीला सतत खोकला येत होता म्हणून तो डॉक्टरांकडे गेला होता. जेव्हा त्याला समजलं की, त्याच्या पोटात बरेच कीटक आहेत तेव्हा त्याला धक्का बसला. याचा खुलासा तेव्हा झाला जेव्हा डॉक्टरांनी त्याचा एक्स-रे काढला. ब्राझीलच्या साओ पाउलोमध्ये हॉस्पिटलचे डॉ. विटोर बोरिन पी. डीसूजा यांनी त्याचे फोटो त्यांच्या ट्विटरवर शेअर केले होते. नंतर हे फोटो व्हायरल झाले. टेस्ट आणि स्कॅनमधून समजलं की, व्यक्ती सिस्टीसर्कोसिसने पीडित होता. जे पोर्क टेपवर्ममुळे होणारं एक संक्रमण आहे.
डॉक्टरांनी सांगितलं कारण....
हे होण्याचं मुख्य कारण सामान्यपणे व्यक्तीकडून दूषित पाणी किंवा आहार घेतल्यामुळे होतं. सीडीसीकडून सांगण्यात आलं की, 'हे संक्रमण तेव्हा होतं जेव्हा एखादी व्यक्ती टॅपवार्मची अंडी गिळतो. लार्वा मांसपेशी आणि मेंदुच्या पेशींमध्ये प्रवेश करतो. याने अल्सर तयार होतं'.
टेपवर्मची अंडी संक्रमित व्यक्तीच्या विष्ठेमध्ये असतात. या स्थितीला टेनियासिस म्हटलं जातं. हा एक वेगळा आजार आहे आणि खराब शिजलेल्या डुकराच्या मांसात सिस्ट खाल्ल्याने होतो. या व्यक्तीचं स्कॅन केलं तेव्हा समजलं की, व्यक्तीच्या मेंदू, छाती आणि फुप्फुसात 700 पेक्षा जास्त टेपवर्म होते.