जेव्हा कस्टमर्स सपोर्टचा विषय निघतो तेव्हा सर्वात पहिलं नाव गुगलचं येतं. गुगल प्रॉडक्ट बाजारात आल्यापासून काही वर्षात त्यांनी त्यांचं वेगळं स्थान तयार केलं आहे. आता गुगलचे प्रॉडक्ट अॅपल आणि सॅमसंगसारख्या कंपन्यांची बरोबरी करताना दिसत आहे.
गुगलचे मोबाईल ग्राहकांमध्ये चांगलेच लोकप्रिय होत आहेत. त्यात गुगल पिक्सलची अधिक लोकप्रियता आहे. भारताबाहेर एका व्यक्तीने गुगल पिक्सल ३ हा मोबाइल खरेदी केला होता. पण त्याला डिफेक्टेड पीस मिळाला. पण त्यानंतर जे झालं ते खरंच आश्चर्यकारकच होतं.
रेडिटवर u/Cheetohz नावाच्या यूजरने गुगल कस्टमर सपोर्टसोबत आलेला त्याचा अनुभव शेअर केला आहे. चीतोजने गुगल पिक्सल ३ चा १२८ जीबी व्हेरिएंटचा मोबाइल बुक केला होता. पण त्याला खराब पीस मिळाल्याने तो हैराण झाला. त्याने कस्टमर सपोर्टला यासाठी संपर्क केला. तेव्हा त्याला ८० डॉलर(५, ५५२ रुपये) रिफंड मिळाले.
पण गुगलकडून चीतोजला अजूनही ९०० डॉलर(६२४८१ रुपये) मिळणे बाकी होते. या प्रक्रियेला वेळ लागत होता. अशात चीतोजला फोनची गरज होती. तेव्हा त्याने गुगल पिक्सल ३ चा नॉट पिंक व्हेरिएंट फोन ऑर्डर केलाय गुगल डीलरने काहीतरी गडबड केली आणि चीतोजला १० पिक्सल ३ फोन पाठवले.
चीतोजचं नशीब इतकं भारी निघालं की, त्याच्याकडे आता १० हजार डॉलर(साधारण ७ लाख रुपये) किंमतीचे गुगल फोन होते. आधी त्याला खराब फोनचं पूर्ण रिफंड मिळत नव्हतं आणि नंतर त्याला १० मोबाइल मिळाले. तो ८ हजार डॉलरने फायद्यात होता.
जर त्याला वाटलं असतं तर तो पिक्सल ३ चे १० मोबाइल त्याच्याकडेच ठेवू शकला असता किंवा विकू शकला असता. कोणताही कायदा त्याला प्रॉडक्ट परत करण्यासाठी जबरदस्ती करु शकला नसता. कारण विक्रेत्याने डिलेव्हरी केली होती. पण चीतोजने असं केलं नाही त्याने चुकून आलेल्या ऑर्डरबाबत गुगलला सूचना दिली.