क्या बात! अर्ध्या रात्री जहाजातून समुद्रात पडली एक व्यक्ती, कचऱ्याने वाचवला त्याचा जीव!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2021 01:57 PM2021-03-01T13:57:57+5:302021-03-01T14:02:09+5:30

या व्यक्तीचं नाव आहे  विदम परवर्तीलोव. तो सिल्वर सपोर्टर नावाच्या एका जहाजावर चीफ इंजिनिअर आणि नाविक होता.

Man survived by hanging on sea rubbish 14 hours | क्या बात! अर्ध्या रात्री जहाजातून समुद्रात पडली एक व्यक्ती, कचऱ्याने वाचवला त्याचा जीव!

क्या बात! अर्ध्या रात्री जहाजातून समुद्रात पडली एक व्यक्ती, कचऱ्याने वाचवला त्याचा जीव!

Next

वेगवेगळ्या हॉलिवूड सिनेमांमध्ये तुम्ही पाहिलं असेल की, एखादी व्यक्ती चुकून समुद्रात पडली तर त्याचं जगणं किती मुश्कील होऊन जातं. काही लोक यातून आश्चर्यकारकपणे वाचतात तर जास्तीत जास्त लोक आपला जीव गमावतात. अशीच एक घटना समोर आली आहे. समुद्रात रात्री पडलेला व्यक्ती समुद्रातील कचऱ्यामुळे आपला जीव वाचवू शकला. 

या व्यक्तीचं नाव आहे  विदम परवर्तीलोव. तो सिल्वर सपोर्टर नावाच्या एका जहाजावर चीफ इंजिनिअर आणि नाविक होता. नुकताच तो जहाजावरून प्रशांत महासागरात पडला. जेव्हा तो समुद्रात पडला तेव्हा त्याने लाइफ जॅकेटही घातलेलं नव्हतं. म्हणजे तो जास्त वेळ तग धरू शकला नसता.(हे पण वाचा : मांजरीमुळे करावी लागली विमानांची इमरजन्सी लॅंडींग, कॉकपिटमध्ये घुसून पायलटवर केला हल्ला...)

१६ फेब्रुवारीला रात्री उशीरा साधारण ३.४५ वाजता ही घटना घडली. विदम परवर्तीलोव इंजिन रूममध्ये फ्लूअल पंपिंग मशीनजवळ होता. झोप आली आणि थकवा जाणवत असल्याने तो हवा खाण्यासाठी बाहेर आला. यादरम्यान स्ट्रेचिंग करत होता. तेव्हाच समुद्रात पडला.

सहा तासांनंतर जहाजावरील इतर कर्मचाऱ्यांच्या लक्षात आलं की, विदम जहाजावर नाहीये. अशात त्याला शोधण्यासाठी जहाज फिरवण्यात आलं. आजूबाजूला इमरजन्सी मेसेज पाठवण्यात आले. १४ तासांनी कुणालातरी आवाज ऐकू आला. दूर समुद्रात एक व्यक्ती जहाजाकडे बघून हात हलवत होता. तो विदम होता. (हे पण वाचा : VIDEO : सुपर मॉम! इमारतीला लागली आग, मुलांना वाचवण्यासाठी आईने केलं 'हे' काम!)

जहाजातून खाली पडल्यावर त्याला काळ्या रंगाचं काहीतरी तरंगताना दिसलं. त्यांना वाटलं हे फिशिंग ब्वॉय असेल. पण तो तर समुद्रात तरंगता कचरा होता. त्यांनी तो धरला. १४ तास त्यांनी त्याच्या कचऱ्याला सोडलं नाही. तो कचरा पकडूनच ते स्वीमिंग करत राहिले. सिल्वर सपोर्टर जहाज लिथुआनिया देशाचं आहे. हे जहाज यूकेतील पिटकॅअर्न आणि न्यूझीलॅंडच्या तांरूगा पोर्ट दरम्यान कार्गो नेतं आणि आणतं.
 

Web Title: Man survived by hanging on sea rubbish 14 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.