पत्नीचं असं सत्य आलं समोर, पती झाला हैराण; लोकांकडे मागितली मदत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2024 12:18 IST2024-02-26T12:17:38+5:302024-02-26T12:18:44+5:30

असं तेव्हा झालं जेव्हा ते दोघेही यूनिवर्सिटीमध्ये सोबत शिकत होते. पण पत्नीला वाटलं की, याने काही फरक पडणार नाही.

Man shocked shared story on Reddit social media for advice after know wife relation with 26 men | पत्नीचं असं सत्य आलं समोर, पती झाला हैराण; लोकांकडे मागितली मदत...

पत्नीचं असं सत्य आलं समोर, पती झाला हैराण; लोकांकडे मागितली मदत...

एका व्यक्तीने सोशल मीडियावर आपली खाजगी कहाणी शेअर करत लोकांकडे मदत मागितली आहे. त्याचं म्हणणं आहे की, त्याला त्याच्या पत्नीचं सत्य समजलं. त्याला समजलं की, त्याच्या पत्नीचे 18 वर्षाआधी अनेक पुरूषांसोबत संबंध होते. त्याने सांगितलं की, असं तेव्हा झालं जेव्हा ते दोघेही यूनिवर्सिटीमध्ये सोबत शिकत होते. पण पत्नीला वाटलं की, याने काही फरक पडणार नाही.

या व्यक्तीने रेडिटवर आपली कहाणी शेअर केली आणि लोकांकडे मदत मागितली. तो म्हणाला की, त्याला हे ठरवता येत नाहीये की, त्याने घटस्फोट घ्यावा की पत्नीने केलेली चूक त्यानेही करावी.

मिरर यूकेच्या रिपोर्टनुसार, व्यक्तीने सांगितलं की, तो आणि त्याची पत्नी एकमेकांसोबत सेकेंडरी स्कूलपासून डेट करत होते. तेव्हा त्यांनी लग्नाचं आणि मुलांची नावेही ठरवली होती. यूनिवर्सिटीमध्ये आल्यावर वेगवेगळे कोर्स मिळाले. पण त्यानंतर त्याने दर विकेंडला तिला भेटण्याचा प्रयत्न केला. 

व्यक्तीने सांगितलं की, मला वाटलं की, आमचं रिलेशनशिप योग्य चालू आहे. व्यक्ती नुकताच एका पार्टीत गेला होता. जिथे पत्नी आणि तिचे म्युच्युअल मित्र होते. यातील एकाने पत्नीबाबत असं काही सांगितलं जे या व्यक्तीला माहीत नव्हतं.
व्यक्तीला दोन मुली आहेत. तो जेव्हा पत्नीसोबत याबाबत बोलला तेव्हा तिने त्याला सगळं सांगितलं. आपल्या पोस्टमध्ये व्यक्तीने लिहिलं की, तिने सांगितलं की, ती यूनिवर्सिटीच्या दिवसांमध्ये क्लबमध्ये जात होती. तिने अनेक पुरूषांसोबत संबंध ठेवले. तिचे अनेक पुरूष मित्र होते. 

ती म्हणाली की, ती फार मॅच्युअर नव्हती. तो तिला बालीशपणा होता. त्यामुळे मी याबाबत तिच्याविरोधात बोललं नाही पाहिजे. त्यानंतर मी लगेच घरातून निघून गेलो आणि एका हॉटेलमध्ये रात्र घालवली. तेव्हाच पत्नीने मेसेज करून सांगितलं की, तिचं माझ्यावर प्रेम आहे. या व्यक्तीच्या पोस्टवर लोक वेगवेगळे सल्ले देत आहेत.

Web Title: Man shocked shared story on Reddit social media for advice after know wife relation with 26 men