फक्त एक बी लावली अन् ७० दिवसात झाडाला लागली भरपूर वांगी; व्हिडीओ पाहून IAS म्हणाले...
By Manali.bagul | Updated: February 24, 2021 18:11 IST2021-02-24T18:03:34+5:302021-02-24T18:11:55+5:30
Trending Viral Video in Marathi : ७० दिवसात या झाडाला भरपूर वांगी लागलेली तुम्ही पाहू शकता. हा व्हिडीओ पाहून तुम्ही विचारात पडाल की, फक्त एका बी मुळे इतकी वांगी कशी काय झाडाला लागू शकतात.

फक्त एक बी लावली अन् ७० दिवसात झाडाला लागली भरपूर वांगी; व्हिडीओ पाहून IAS म्हणाले...
तुम्ही कधी वांग कधी झाडावर उगवताना पाहिलंय का? नसेल पाहिलं तर या व्हिडीओमध्ये तुम्हाला हे नक्की पाहायला मिळेल. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक माणूस वांग्याचं झाड लावत आहे. बघता बघता ७० दिवसात या झाडाला भरपूर वांगी लागलेली तुम्ही पाहू शकता. हा व्हिडीओ पाहून तुम्ही विचारात पडाल की, फक्त एका बी मुळे इतकी वांगी कशी काय झाडाला लागू शकतात.
Although I’ve seen this miracle day in and day out in my garden, seeing this on time lapse is just all kinds of magical. pic.twitter.com/guLjBot7Vi
— Nandita Iyer (@saffrontrail) February 17, 2021
हा व्हिडिओ आयएएस अधिकारी डॉ. एम व्ही राव यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हिडिओसह त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'निसर्गाची जादू.' या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की एखादी व्यक्ती प्रथम वांग्याचे काप करते, मग त्यापासून एक बी काढते आणि त्यास खत आणि मातीने भरलेल्या भांड्यात दाबते. त्यानंतर तो त्यात पाणी ओतले जातं. चिंताजनक! देशात समोर आला कोरोनाचा नवा स्ट्रेन; व्हायरसच्या जुन्या रुपापेक्षा वेगळी आहेत ७ लक्षणं
तुम्ही पाहिलं असेल की, की 6 दिवसांनंतर, त्यातून एक लहान वनस्पती तयार होते. ३० दिवसांत, वनस्पती मोठी होते आणि बरीच पानं उगवतात. ५० व्या दिवसापासून झाडावर फुलेही येऊ लागतात. ६० दिवसात सर्व फुले पूर्णपणे फुलतात आणि ७० व्या दिवशी तुम्हाला दिसेल की वांग्याची झाडही येते. हा व्हिडिओ पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत आणि निसर्गाच्या या दृश्याचे कौतुक करीत आहेत. मास्क लावल्यानंतर डोकेदुखी अन् अस्वस्थ वाटतंय? अशावेळी करायचं तरी काय, तज्ज्ञांनी सांगितले उपाय