शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
2
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
3
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
4
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
5
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
6
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
7
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
8
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
9
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
10
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
11
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
12
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
13
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
14
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
15
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
16
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
17
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
18
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
19
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
20
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?

गेले १० महिने विद्युत विभागात मसाला कुटतोय शेतकरी, कारण वाचून येईल संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2022 10:30 IST

नुकतंच दक्षिण भारतातील कर्नाटक राज्यातील एका शेतकऱ्याची कहाणी समोर आली आहे, जो रोज मसाले कुटण्यासाठी आणि फोन चार्ज करण्यासाठी वीज विभागाच्या कार्यालयात पोहोचतो.

आपल्या देशातूनही अनेकदा एकापेक्षा एक विचित्र घटना समोर येतात. नुकतंच दक्षिण भारतातील कर्नाटक राज्यातील एका शेतकऱ्याची कहाणी समोर आली आहे, जो रोज मसाले कुटण्यासाठी आणि फोन चार्ज करण्यासाठी वीज विभागाच्या कार्यालयात पोहोचतो (Farmer Grinds Masala in Electricity Office). तुम्हालाही ही घटना जाणून विचित्र वाटेल, पण वीज विभागाचं कार्यालय घराच्या जवळच असल्याने तो या कामांसाठी रोज तिथे पोहोचतो हे खरं आहे.

एम हनुमंतप्पा असं या व्यक्तीचं नाव असून तो कर्नाटकातील शिवमोगा जिल्ह्यातील मंगोटे गावात राहतो. हनुमंतप्पा यांचं घर मंगलोर इलेक्ट्रिसिटी सप्लाय कंपनी लिमिटेड अर्थात MESCOM च्या कार्यालयाजवळ आहे. अशा परिस्थितीत, ते निर्भयपणे आपल्या घरातील मसाले मिक्सरवर कुटण्यासाठी तिथे जातात. एवढंच नाही तर हा शेतकरी आपल्या घरातील फोनही तिथे जाऊन चार्ज करतो.

तुम्हाला हे ऐकून खूप आश्चर्य वाटेल आणि विचित्रही वाटेल पण हनुमंतप्पासाठी हे सामान्य आहे. गेल्या १० महिन्यांपासून ते हेच काम करत आहेत. विशेष म्हणजे कार्यालयातील कोणालाही त्यांच्या या कामाची अडचण नाही. हनुमंतप्पा यांच्या घरी वीजपुरवठा असला तरी त्यांना फक्त ३-४ तास वीज मिळते. त्यांनी आपल्या भागातील विजेची समस्या विद्युत विभागापासून ते स्थानिक आमदारापर्यंत सांगितली मात्र कोणतीही मदत मिळाली नाही.

एके दिवशी त्यांनी MESCOM च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला फोनवर विचारलं की फोन चार्ज आणि मसाला दळणे यासारख्या मूलभूत गोष्टींसाठी मी कुठे जायचं? संतप्त झालेल्या अधिकाऱ्याने त्याला कार्यालयात जाऊन मसाले बारीक करण्यास सांगितलं. हनुमंतप्पा यांनी हा मुद्दा गांभीर्याने घेतला.

MESCOM कार्यालयात उपस्थित असलेल्या १० कनिष्ठ कर्मचार्‍यांपैकी कोणीही त्यांना सरकारी कार्यालयांचा वैयक्तिक वापर करण्यास रोखत नाही. त्यांचा हा किस्सा व्हायरल झाल्यापासून सर्वजण या घटनेवर आश्चर्य व्यक्त करत आहेत. कार्यालयाच्या कनिष्ठ अभियंत्याने दिलेल्या माहितीनुसार, एका महिन्यात हनुमंतप्पा यांच्या घरात मल्लपुरा वितरण केंद्रातून लाईन काढली जाईल आणि त्यांना व्यवस्थित वीजपुरवठा मिळेल. सध्या हनुमंतप्पाने मसाले कुटण्यासाठी ऑफिसमध्ये जाण्याचा प्रवास थांबवला आहे, परंतु अद्याप त्यांच्या घरी वीज पोहोचलेली नाही.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेKarnatakकर्नाटक