पत्नीचा मोबाइल चेक केल्यावर पतीला बसला धक्का, बॉयफ्रेन्डसोबतचे 'तशा' अवस्थेतील सापडले व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2021 13:32 IST2021-12-31T13:31:05+5:302021-12-31T13:32:48+5:30
झोपण्यापूर्वी एका व्यक्तीची पत्नी त्याला फिजिकल रिलेशनमध्ये काहीतरी वेगळं करण्याबाबत बोलत होती. पण पतीला तेव्हा धक्का बसला जेव्हा त्याने पत्नीचा फोन चेक केला.

पत्नीचा मोबाइल चेक केल्यावर पतीला बसला धक्का, बॉयफ्रेन्डसोबतचे 'तशा' अवस्थेतील सापडले व्हिडीओ
वैवाहिक जोडप्याच्या जीवनात शारीरिक संबंध ही एक महत्वाची बाब असते. पण अनेकदा लोक याचाच विचार करत असं काही करून बसतात की, त्यांचं नातंच बिघडतं. झोपण्यापूर्वी एका व्यक्तीची पत्नी त्याला फिजिकल रिलेशनमध्ये काहीतरी वेगळं करण्याबाबत बोलत होती. पण पतीला तेव्हा धक्का बसला जेव्हा त्याला पत्नीच्या मोबाइलमध्ये तिचा दुसऱ्याच व्यक्तीसोबत फिजिकल रिलेशनचा व्हिडीओ पाहिला. जेव्हा त्याने याबाबत पत्नीला विचारलं तर ती म्हणाली की, हे तिचे व्हिडीओ नाहीत.
Daily Star च्या वृत्तानुसार, सॅमचं जेव्हा लग्न होणार होतं तेव्हा त्याच्या होणाऱ्या पत्नीने तिच्या अफेअरबाबत त्याला सांगितलं होतं. तेव्हा त्याने तिला माफ केलं होतं. लग्नाच्या सात वर्षानंतरही त्यांचं लैंगिक जीवन चांगलं सुरू होतं. पण त्याची पत्नी नेहमीच झोपण्याआधी या विषयावर जास्तच बोलत होती.
मोबाइल पाहून बसला धक्का
या गोष्टींमुळे पतीला संशय आला आणि त्याने पत्नीचा मोबाइल चेक केला. मोबाइल चेक केल्यावर जे दिसलं ते पाहून त्याला धक्का बसला. मोबाइलमध्ये इतर लोकांसोबत डेटिंग आणि फिजिकल रिलेशनचे व्हिडीओ भरून होते. याबाबत जेव्हा त्याने पत्नीला विचारलं तर पत्नीने खोटं सांगितलं. ती म्हणाली की, हे तिचे व्हिडीओ नाहीत.
या गोष्टीमुळे सॅम फारच संतापला होता. फार टेंशनमध्ये आला होता, पण तो फार काही करू शकला नाही. हे कन्फेस करण्यासाठी त्याने पॉडकास्टचा आधार घेतला. पॉडकास्टमधील त्याचं बोलणं आता सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे.