बाबो! तरुणाने चुकून स्वतःच्याच बहिणीशी केला साखरपुडा; प्री-वेडिंग शूटदरम्यान समोर आलं सत्य अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2022 15:26 IST2022-01-30T15:17:52+5:302022-01-30T15:26:38+5:30
एका व्यक्तीने आपल्याच चुलत बहिणीसोबत साखरपुडा केला. मात्र प्री-वेडिंग शूटच्या वेळीच त्यांना त्यांचं खरं नातं समजलं आणि त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.

बाबो! तरुणाने चुकून स्वतःच्याच बहिणीशी केला साखरपुडा; प्री-वेडिंग शूटदरम्यान समोर आलं सत्य अन्...
अमेरिकेत एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने आपल्याच चुलत बहिणीसोबत साखरपुडा केला. मात्र प्री-वेडिंग शूटच्या वेळीच त्यांना त्यांचं खरं नातं समजलं आणि त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. यावेळी हे कपल आपल्या पूर्वजांबद्दल एकमेकांसोबत चर्चा करत होतं. तेव्हाच त्यांना समजलं की ते चुलत भाऊ-बहीण आहेत. डेली स्टारने दिलेल्या वृत्तानुसार, जेसी स्टे (Jesse Stay) असं या तरुणाचं नाव असून त्याने या गोष्टीचा खुलासा स्वतः एका टिकटॉक व्हिडिओच्या माध्यमातून केला.
सोशल मीडियावर हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. प्री-वेडिंग शूटच्या वेळी जेसी आणि त्याच्या होणाऱ्या पत्नीने एकमेकांच्या पूर्वजांबद्दल चर्चा केली. यातच त्यांना ते एकमेकांचे भाऊ-बहीण असल्याचं समजलं. जेसी स्टेने सांगितलं, 'हे समजताच मी हैराण झालो की मी माझ्या चुलत बहिणीसोबतच साखरपुडा केला. आम्ही दोघांनी जेव्हा एकमेकांच्या पूर्वजांबद्दल चर्चा केली, तेव्हा आम्हाला समजलं की आम्ही एकाच घरातील आहोत. मी माझ्या भावी पत्नीचा चुलत भाऊ आहे.'
जेसीने सांगितलं की 'जेव्हा मी योग्य पद्धतीने तपास केला तेव्हा एक फोटोही सापडला. ज्यात आमचे पूर्वज एकसोबत दिसत होते. आम्हाला या गोष्टीचा अजिबातही अंदाज नव्हता की आम्ही चुलत बहीण-भाऊ आहोत. पूर्वजांनुसार माझी भावी पत्नी माझी थर्ड कजन आहे. याबाबत समजताच धक्का बसला.
अनेकांच्या म्हणण्यानुसार, थर्ड कजनसोबत लग्न करता येतं. मात्र, आता मला हे योग्य वाटत नाही. जेसीने सांगितलेल्या या घटनेनंतर अनेकांनी सोशल मीडियावर यावर कमेंट केल्या आहेत. अनेकांनी जेसीला आधार देत म्हटलं, की तू चुलत बहिणीसोबत साखरपुडा केला, यात तुझी काहीही चूक नाही. कारण याबद्दल तुला काहीही माहिती नव्हतं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.