बाबो! 'या' व्यक्तीच्या नाकात आला दात, एक्स-रे पाहून डॉक्टरही झाले हैराण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2019 12:13 IST2019-11-15T12:10:48+5:302019-11-15T12:13:52+5:30

मानवी शरीर एक अवघड संघटनात्मक संरचना आहे. जर शरीरात सर्वच क्रिया व्यवस्थित नसतील तर लगेच काहीना काही समस्या होऊ लागते आणि व्यक्ती आजारी पडतो.

Man complaining of a stuffy nose had a tooth in his nose | बाबो! 'या' व्यक्तीच्या नाकात आला दात, एक्स-रे पाहून डॉक्टरही झाले हैराण!

बाबो! 'या' व्यक्तीच्या नाकात आला दात, एक्स-रे पाहून डॉक्टरही झाले हैराण!

मानवी शरीर एक अवघड संघटनात्मक संरचना आहे. जर शरीरात सर्वच क्रिया व्यवस्थित नसतील तर लगेच काहीना काही समस्या होऊ लागते आणि व्यक्ती आजारी पडतो. कधी-कधी तर शरीरात अशा समस्या होतात की, त्यावर विश्वासही बसत नाही. असंच काहीसं चीनमधील एक व्यक्तीसोबत झालं. तुमचा विश्वास बसणार नाही, पण इथे एका व्यक्तीच्या नाकात दात उगवला.

चीनमध्ये राहणारा झांग बिंसेंग याला गेल्या तीन महिन्यांपासून नाकाने श्वास घेण्यास अडचण येत होती. यासोबतच झांगला नाकात इतरही काही समस्यांची तक्रार होती. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या वेदनांमुळे झांग फार हैराण झाला होता. त्रास हाताबाहेर गेल्यावर झांगने डॉक्टरांकडे धाव घेतली. 

डॉक्टरांनी त्याला एक्स-रे काढण्यास सांगितला. डॉक्टरांनी जेव्हा रिपोर्ट पाहिला तेव्हा त्यांना नाकाच्या मागे एक दात उगवल्याचं दिसलं. डॉक्टरांनी झांगला हे सांगितलं तर तो हैराण झाला. यावर डॉक्टरांचं मत आहे की, झांगच्या नाकात दात निघण्याचं कारण एक दुर्घटना आहे. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, जेव्हा झांग १० वर्षांचा होता तेव्हा एका मॉलच्या तिसऱ्या मजल्यावरून खाली पडला होता. यात झांगचे दोन दात तुटले होते. पण त्यातील केवळ एकच दात शोधण्यात आला होता. डॉक्टरांचा असा अंदाज आहे की, दुसरा दात उखडला गेला असावा आणि तो नाकामागून निघाला असावा.

आश्चर्याची बाब म्हणजे २० वर्षांपर्यंत याचा पत्ता ना झांगला लागला ना त्याच्या परिवारातील लोकांना. आज झांगचं वय ३० वर्षे आहे. आता डॉक्टरांनी ३० मिनिटांच्या सर्जरीनंतर झांगच्या नाकातून एक सेंटीमीटर लांब दात काढून टाकलाय.


Web Title: Man complaining of a stuffy nose had a tooth in his nose