आर्मीच्या पायलटने एलिअनसोबत घालवले तीन महिने? त्याची कहाणी वाचूनव व्हाल अवाक्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2024 13:31 IST2024-02-08T13:31:22+5:302024-02-08T13:31:55+5:30
तो म्हणाला की, 92 दिवस म्हणजे साधारण 3 महिने तो एलिअन्ससोबत राहून परतला. ही घटना त्याच्यासोबत बालपणी झाली होती.

आर्मीच्या पायलटने एलिअनसोबत घालवले तीन महिने? त्याची कहाणी वाचूनव व्हाल अवाक्...
एलिअन्सबाबत नेहमीच वेगवेगळे दावे केले जातात. पण हे दावे कधीच सिध्द होऊ शकले नाहीत. पण जेव्हाही एखाद्या मोठ्या पदावरील व्यक्ती दावा करतात तेव्हा या दाव्यांवरील लोकांचा विश्वास वाढतो. असंच काहीसं अमेरिकन सेनेतील माजी हेलिकॉप्टर पायलटने केला आहे.
तो म्हणाला की, 92 दिवस म्हणजे साधारण 3 महिने तो एलिअन्ससोबत राहून परतला. ही घटना त्याच्यासोबत बालपणी झाली होती.
एलेक्स कोलियरने सांगितलं की, 1980 च्या दशकात तो दुसऱ्यांदा Andromedians नावाच्या एलिअन्सच्या प्रजातीच्या संपर्कात आला होता. त्यांनी स्वप्नांच्या माध्यमातून त्याच्याशी संवाद साधला.
त्याची दोन एलिअन्ससोबत भेट झाली. तो याआधी 1960 मध्ये एलिअन्सच्या संपर्कात आला होता. एलेक्सने सांगितलं की, तेव्हा तो त्याच्या आजोबांच्या घरी चुलत भावांसोबत लपाछपी खेळत होता.
जेव्हा तो मक्याच्या शेतात जाऊन लपला तेव्हा त्याच्यासोबत ही घटना घडली. त्याला केवळ इतकं आठवतं की, तो तिथे झोपला होता. जेव्हा डोळे उघडले तेव्हा तो एका स्पेसशिपमध्ये होता. इथे एलिअन्ससोबत बोलण्यासाठी त्याला एक बेल्ट लावण्यात आला होता.
तो इथे तीन महिने राहिला. एलेक्सने सांगितलं की, यादरम्यान एलिअन्सने त्याच्यासोबत चांगला व्यवहार केला. त्यांनी त्यांची संस्कृती आणि इतिहासाबाबत सांगितलं.
या तीन महिन्यात त्याने अनेक ग्रह आणि डायमेंशनचा प्रवास केला. त्यानंतर त्याला त्याच्या आजोबाच्या घरी परत सोडण्यात आलं. यादरम्यान कुणालाही तो गायब झाल्याचं कळालं नाही.
2007 मध्ये एका वेबसाइटसोबत बोलताना तो म्हणाला की, युनिवर्स खूप मोठं आहे. यात मनुष्य एकटे नाहीत. तो असंही म्हणाला की, आपले दावे सिद्ध करण्यासाठी त्याच्याकडे व्हिडीओ, फोटो आणि डॉक्युमेंट्स आहेत. पण तो ते सार्वजनिकपणे जाहीर करू शकत नाही.