व्यक्तीचा दावा, ChatGPT नं वाचवला त्याचा जीव; दिली त्याला झालेल्या गंभीर आजाराची माहिती!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 10:15 IST2025-01-20T10:14:18+5:302025-01-20T10:15:20+5:30
एका व्यक्तीनं दावा केला आहे की, आर्टिफिशिअल इन्टॅलीजन्स चॅटबॉट ChatGPT ने त्याला गंभीर आजार झाल्याचं सांगितलं आणि त्याचा जीव वाचवला.

व्यक्तीचा दावा, ChatGPT नं वाचवला त्याचा जीव; दिली त्याला झालेल्या गंभीर आजाराची माहिती!
AI म्हणजे आर्टिफिशिअल इन्टॅलीजन्सचा वापर अलिकडे खूप जास्त वाढला आहे. बरेच लोक याचा चांगल्या प्रकारे वापर करून आपलं काम सोपं करत आहेत. तर मोठ्या संख्येने लोक याचा गैरवापरही करत आहेत. अशात एका व्यक्तीनं दावा केला आहे की, आर्टिफिशिअल इन्टॅलीजन्स चॅटबॉट ChatGPT ने त्याला गंभीर आजार झाल्याचं सांगितलं आणि त्याचा जीव वाचवला. चला जाणून घेऊ ChatGPT नं व्यक्तीचा जीव कसा वाचवला.
सोशल मीडियावर एका व्यक्तीनं दावा केला की, ChatGPT नं त्याचा जीव वाचवला. त्यानं लिहिलं की, 'जवळपास एक आठवड्याआधी मी एक्सरसाईज करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मला असं जाणवलं की, मी कुणाला तरी धडक दिली आणि मला आजारी असल्यासारखं वाटू लागतं. मी केवळ पुशअप्स, स्क्वॅट आणि प्लॅंक एक्सरसाईज केल्या होत्या. थोडी जास्त कॉफी प्यायलो होतो'.
तो म्हणाला की, त्याला दोन दिवस अजिबात बरं वाटत नव्हतं आणि आजारी वाटत होतं. त्यानंतर त्यानं हे कोणत्या आजाराची लक्षण आहे हे जाणून घेण्यासाठी टेस्ट करण्याचा प्रयत्न केला. यासाठी त्यानं ChatGPT ची मदत घेतली. जेव्हा व्यक्तीनं ChatGPT ला समस्या सांगितली, तेव्हा तो हैराण झाला. कारण त्याला लगेच हॉस्पिटलमध्ये जाण्याचा सल्ला मिळाला.
ChatGPT वर त्याला उत्तर मिळालं की, व्यक्ती “रॅबडोमायोलिसीस” ने ग्रस्त आहे. त्यानंतर व्यक्तीनं आणखी थोडी माहिती मिळवली तेव्हा त्याला समजलं की, चॅटबॉट बरोबर आहे. नंतर व्यक्ती लगेच हॉस्पिटलमध्ये गेली आणि टेस्ट केल्यावर समजलं की, त्याला गंभीर रॅबडोमायोलिसीस आजार झाला आहे. हा आजार तेव्हा होतो, जेव्हा मांसपेशी वेगानं तुटू लागतात आणि प्रोटीन किडनीमध्ये अडथळा निर्माण करतं.
व्यक्तीनं सांगितलं की, मला डॉक्टरकडून हे समजलं की, मला कोणता आजार आहे.
यानंतर व्यक्तीनं ChatGPT चं भरभरून कौतुक केलं. तो या गोष्टीनं अधिक प्रभावित झाला की, ChatGPT किती अॅडव्हान्स झालं आहे. तो म्हणाला की, मी ChatGPT द्वारे लोकांच्या जीव वाचल्याच्या घटना वाचल्या आहेत. पण मी कधीही याचा विचार केला नव्हता की, मी सुद्धा त्यांच्यापैकी एक ठरेल. धन्यवाद ChatGPT.