पार्टनरसोबत संबंध ठेवताना झालं असं काही, तरूणाच्या प्रायव्हेट पार्टची करावी लागली सर्जरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2021 11:10 IST2021-07-02T11:08:24+5:302021-07-02T11:10:30+5:30

'द सन'मध्ये प्रकाशित रिपोर्टनुसार, पीडित तरूणाने सांगितलं की, जोरदार वेदना सुरू झाल्यावर मी पाहिलं तर प्रायव्हेट पार्टमधून रक्त येत होतं.

Man broke his private part while making relationship with partner | पार्टनरसोबत संबंध ठेवताना झालं असं काही, तरूणाच्या प्रायव्हेट पार्टची करावी लागली सर्जरी

पार्टनरसोबत संबंध ठेवताना झालं असं काही, तरूणाच्या प्रायव्हेट पार्टची करावी लागली सर्जरी

यूनायटेड किंगडममधून एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. इथे एका तरूणाच्या प्रायव्हेट पार्टमध्ये पार्टनरसोबत संबंध ठेवताना अचानक फ्रॅक्टर आला. अचानक त्याच्या प्रायव्हेट पार्टमध्ये जोरदार वेदना होत होत्या. त्यानंतर त्याला लगेच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं.  

'द सन'मध्ये प्रकाशित रिपोर्टनुसार, पीडित तरूणाने सांगितलं की, जोरदार वेदना सुरू झाल्यावर मी पाहिलं तर प्रायव्हेट पार्टमधून रक्त येत होतं. त्यावर सूज आली होती. सगळीकडे फक्त रक्तच रक्त दिसत होतं.

एक्सपर्टनुसार, Erectile Tissue सोबत जुळलेली नस डॅमेज झाल्याने तरूणांचा प्रायव्हेट पार्ट तुटतो म्हणजे त्यात फ्रॅक्चर येतो. यात असं वाटतं जणू शरीरातील एखादं हाड मोडलं असावं. डॉक्टरांनी सांगितलं की, पीडित तरूणाचा एमआरआय स्कॅन करण्यात आलं. ज्यातून समोर आलं की, तरूणाच्या प्रायव्हेट पार्टमध्ये ३ सेंटीमीटर लांब  भेग आहे. 

रिपोर्ट पाहिल्यावर डॉक्टरांनी तरूणावर सर्जरी करण्याचा निर्णय घेतला. डॉक्टरांनी सांगितलं की सर्जरीच्या ६ महिन्यांनंतर तरूण पूर्णपणे बरा होईल. तो पुन्हा पार्टनरसोबत संबंध ठेवू शकणार आहे. डॉक्टर म्हणाले की, गेल्या ४० वर्षात त्यांनी अशी पहिली केस पाहिली. तरूणाच्या प्रायव्हेट पार्टची सर्जरी यशस्वी झाली आणि तो लवकरच पूर्णपणे बरा होईल.
 

Web Title: Man broke his private part while making relationship with partner