शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

क्या बात! दोन महिलांचा जीव वाचवण्यासाठी या व्यक्तीने रोजा सोडून डोनेट केला प्लाझ्मा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2021 10:33 IST

कोरोनाच्या थैमानात काही लोक माणूसकीला जपत दुसऱ्या लोकांची मदत करत आहेत. अकील अहमद त्यापैकीच एक व्यक्ती आहेत. रमजानचा पवित्र महिना सुरू आहे.

कोरोना व्हायरसने पुन्हा एकदा देशभरात आपलं डोकं वर काढलं आहे. सतत कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या वाढत आहे. लोक त्यामुळे हैराण झाले आहेत. हॉस्पिटल्समध्ये बेड मिळत नाही. एक्सपर्ट्सचा दावा आहे की, कोरोना व्हायरसचा आताचा स्ट्रेन आधीपेक्षा अधिक घातक आहे. अशातही काही लोक माणूसकीला जपत दुसऱ्या लोकांची मदत करत आहेत. अकील अहमद त्यापैकीच एक व्यक्ती आहेत. रमजानचा पवित्र महिना सुरू आहे. अकीनने दोन महिलांचा जीव वाचवण्यासाठी जे केलं त्याने सर्वांचं मन जिंकलं आहे.

टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, उदयपूरच्या पॅसिफिक हॉस्पिटमध्ये छोटी सादडी गावातील ३६ वर्षीय निर्मला चार दिवसांपासून तर ऋषभदेव येथे राहणारी ३० वर्षीय अलका दोन दिवसांपासून भरती आहे. दोघींही तब्येत गंभीर आहे. दोघींचाही ब्लड ग्रुप एक पॉझिटिव्ह होता. दोघींनाही प्लाझ्माची गरज होती. (हे पण वाचा : सलाम! कोरोना रुग्णाची वेणी घालतानाचा डॉक्टरचा व्हिडीओ व्हायरल, दृश्य पाहून तुम्हीही व्हाल भावूक)

डॉक्टरांनी लगेच प्लाझ्माची व्यवस्था करण्यास सांगितले. यादरम्यान रक्त युवा वाहिनीच्या कार्यकर्त्यांपर्यंत ही गोष्ट पोहोचली. ते प्लाझ्माच्या शोधात असताना त्यांना अकील मंसूरी यांची आठवण आली. कारण त्यांनी याआधी १७ वेळा रक्तादान केलं होतं. त्यांचा ब्लड ग्रुप ए  पॉझिटिव्ह असल्याचे माहीत होते. (हे पण वाचा: यवतमाळच्या अभियंत्याने साकारले बहुपयोगी व्हेंटिलेटर, केंद्र सरकारचीही मान्यता)

दोन्ही महिलांना ए पॉझिटिव्ह व्यक्तीच प्लाझ्मा देऊ शकत होती. कार्यकर्ता अर्पित कोठारी यांनी अकील यांना प्लाझ्मा देण्याची विनंती केली. मात्र, अकील यांनी रोजा ठेवला होता. तरी ते प्लाझ्मा डोनेट करायला पोहोचले. तर डॉक्टर म्हणाले की, रिकाम्या पोटी प्लाझ्मा घेऊ शकत नाहीत.

आधी रोजा तोडला नंतर निभावला धर्म

अलीक यांनी आधी आपला रोजा तोडला. नंतर त्यांनी अल्लाहचे आभार मानले. त्यानंतर नाश्ता केला. डॉक्टरांनी त्यांची अॅंटी बॉडी टेस्ट केली. नंतर त्यांचा प्लाझ्मा घेतला. हा प्लाझ्मा दोन्ही महिलांना देण्यात आला. अकील यांनी तिसऱ्यांदा प्लाझ्मा डोनेट केला आहे. ते म्हणाले की, दे अल्लाहकडे प्रार्थना करतील की, दोन्ही महिला लवकर ठीक व्हाव्यात. 

टॅग्स :Rajasthanराजस्थानcorona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यJara hatkeजरा हटके