बॅंकेतील कर्मचाऱ्याने लोकांचे ६२ लाख रूपये केले लंपास, इन्स्टावर टाकला फोटो अन्.....

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2019 11:41 AM2019-12-17T11:41:40+5:302019-12-17T11:48:27+5:30

इतकेच नाही तर त्याने याच पैशांमधून नवीन मर्सिडीज कारसाठी डाउन पेमेंटही केलं.

This man bank vault after flexing with money on social media | बॅंकेतील कर्मचाऱ्याने लोकांचे ६२ लाख रूपये केले लंपास, इन्स्टावर टाकला फोटो अन्.....

बॅंकेतील कर्मचाऱ्याने लोकांचे ६२ लाख रूपये केले लंपास, इन्स्टावर टाकला फोटो अन्.....

Next

अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामधील एक घटना समोर आली आहे. इथे कथित रूपाने एका व्यक्तीने बॅंकेतील लोकांचे पैसे लांबवले. त्याने ६२ लाख रूपयांचा फ्रॉड केल्याचा आरोप आहे. त्याने पैशांसोबतचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आणि तो पकडला गेला.

Arlando Henderson ही व्यक्ती Charlotte financial Institution सोबत काम करते. त्याच्यावर आरोप आहे की, त्याने ग्राहकांच्या डिपॉझिट अकाऊंटमधून ८८ हजार डॉलर चोरी केले. एकप्रकारे त्याने फ्रॉडच केला. भारतीय करन्सीनुसार ही रक्कम ६३ लाख रूपयांपेक्षा अधिक होते. १८ वेळा त्यांनी लोकांच्या वेगवेगळ्या अकाऊंट्समधून पैसे चोरी केले.

त्याने पैसे चोरी केल्यावर पैशांसोबतचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला. व्हिडीओ सुद्धा काढला. याच आधारे एफबीआयने त्याला अटक केली. या पैशांच्या माध्यमातून त्याने नवीन मर्सिडीज कारसाठी डाउन पेमेंटही केलं होतं. त्याने २० हजार डॉलर जमा केले होते.

सद्या पोलीस या प्रकरणाची चौकशी करत असून जर आरोप सिद्ध झाले तर त्याला ३० वर्षांची शिक्षा होऊ शकते आणि १ मिलियन डॉलरची पेनल्टीही लागू शकते.


Web Title: This man bank vault after flexing with money on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.