मानलं गड्या! लॉकडाऊनमुळे पायलटची नोकरी गेली अन् आता युनिफॉर्मवरच विकताहेत नूडल्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2020 18:54 IST2020-11-12T18:49:08+5:302020-11-12T18:54:21+5:30
Inspirational Stories in Marathi : लॉकडाऊनमुळे अनेकांवर मिळेल ते काम करण्याची वेळ आली. कोरोनामुळे त्यांचीही नोकरी गेली. पण त्यांनी हिंमत हारली नाही.

मानलं गड्या! लॉकडाऊनमुळे पायलटची नोकरी गेली अन् आता युनिफॉर्मवरच विकताहेत नूडल्स
कोरोनाकाळात सर्वसामान्यापासून, समाजातील श्रीमंत वर्गाला अनेक संकटांचा सामना करावा लागला. कोणाची नोकरी गेली तर कोणाचा व्यवसाय बंद पडला. लॉकडाऊनमुळे अनेकांवर मिळेल ते काम करण्याची वेळ आली. अनेकांनी हार मानता, परिस्थितीला दोष न देता उत्पन्नाचे वेगवेगळे मार्ग शोधायला सुरूवात केली आणि त्या क्षेत्रात यशस्वी झाले. आज आम्ही तुम्हाला नोकरी गेलेल्या एका गृहस्थाची कहाणी सांगणार आहोत.
पायलट अजरीन मोहम्मद जाववी असं त्याचे नाव आहे. अजरीन हे मलेशियाचे पायलट होते. कोरोनामुळे त्यांची नोकरी गेली. पण त्यांनी हिंमत हारली नाही. क्वालालंपूरमध्ये स्वत:ची नुडल्स विकण्याची गाडी सुरू केली. विशेष म्हणजे अजरीन गाडीवर काम करताना पायलटचा युनिफॉर्म आणि टोपीसुद्धा घालतात.
अजरीन यांनी गेल्या वीस वर्षांपासून पायलटची नोकरी करत होते. आता वयाच्या ४४ व्या वर्षीही ते दिवसभर उभे राहून नूडल्सची गाडी चालवतात. अजनीन यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, ''नोकरी गेल्यामुळे मला पोट भरण्यासाठी पैशांची गरज होती माझ्यासोबत माझी ४ मुलं आणि बायको राहते. घर चालवण्याच्या हेतूने मी फूड स्टॉलची सुरूवात केली.
देव तारी त्याला कोण मारी! मातीत पुरलेलं नवजात बाळ, अनोळखी माणसांनी काढलं बाहेर अन्...
सध्या पायलटच्या ड्रेसमध्ये ते लोकांना नूडल्स सर्व्ह करतात. त्यांच्या हटके स्टाईलमुळे त्यांच्याकडे अनेक ग्राहक येत असून अजरीन काम करत असलेल्या नुडल्सच्या गाडीवर यांच्या पदार्थांचा चांगला खप होत आहे. आहे. त्यांच्या फूड स्टॉलवर आलेले खवय्ये त्यांच्या Kapten Corner चे फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहेत. त्यांच्या या फूड स्टॉलला फारच कमी वेळात चांगली प्रसिद्धी मिळाली आहे. अजरिन यांनी कहाणी अनेकांसाठी प्रेरणादायी ठरली आहे. माणूसकीला सलाम! दगडाखाली २ तास अडकलेल्या महिलेला गावकऱ्यांनी दिलं जीवदान; पाहा फोटो