बाबो... लॉकडाऊनमध्येही 'कडकनाथ' कोंबड्यांची लूट; सीसीटीव्हीत चोरटे झाले शूट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2020 19:39 IST2020-05-21T19:28:48+5:302020-05-21T19:39:26+5:30

५० पेक्षा जास्त कडकनाथ कोंबडे घेऊन चोरटे फरार झाले आहेत.

Madhya pradesh kadaknath cock robbery capture in cctv myb | बाबो... लॉकडाऊनमध्येही 'कडकनाथ' कोंबड्यांची लूट; सीसीटीव्हीत चोरटे झाले शूट

बाबो... लॉकडाऊनमध्येही 'कडकनाथ' कोंबड्यांची लूट; सीसीटीव्हीत चोरटे झाले शूट

मध्य प्रदेशातातील बैतूल जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. बैतुल जिल्ह्यातील सारणी भागात बगडोनामध्ये एका कडकनाथ कोंबड्यांच्या पोल्ट्री फॉर्ममध्ये चोरी झाली आहे.  या  ठिकाणी उपस्थित असलेल्या सुरक्षारक्षकांवर हल्ला करून चोरट्यांनी कोंबड्या पळवून नेल्या आहेत. ५० पेक्षा जास्त कडकनाथ कोंबडे घेऊन चोरटे फरार झाले आहेत.

ही घटना शनिवारी रात्री १२ वाजताच्या दरम्यान घडली. या घटनेतील साडे चार मिनिटांचा व्हिडीओ सीसीटिव्ही कॅमेरामध्ये रोकॉर्ड  झाला आहे. या प्रकाराची सीसीटिव्ही फुटेज आता समोर आली आहे. माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार मासाहार करण्याचे शौकिन असलेल्या लोकांना कडकनाथ कोंबडे खूप आवडतात. सीसीटिव्ही फुटेजच्या आधारे पोलिस चोरट्यांचा शोध घेत आहेत. पण लॉकडाऊनमध्ये प्रशासनाचा काटेकोर बंदोबस्त असताना चोरांनी हे कोंबडे कसे चोरले  असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. 

नादच खुळा! लॉकडाऊनमध्ये रातोरात बनला करोडपती; अन् आता करणार 'हे' काम

पोल्ट्री फार्मचे संचालक योगेश जावलकर यांनी दिलेल्या माहितीनुसार चोरीचा प्रकार कॅमेरात कैद झाला असून साधारणपणे १ लाखांपेक्षा जास्त नुकसानाचा सामना करावा लागत आहे. कारण बाजारात कडकनाथ कोंबड्याची विक्री २०००  रुपयांना केली जातो. या भागात मुख्य रस्त्यावर कडकनाथ कोंबड्याचे एकच पोल्ट्री फॉर्म आहे.  पोल्ट्री फार्म मालकाने याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलीस अधिकारी श्रध्दा जोशी, यांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेबाबत  १०० वर माहिती प्राप्त झाली. सध्या पोलीस या चोरीच्या प्रकारातील  चोरट्यांचा शोध घेत आहेत. 

केवळ अंतर्वस्त्रांवर पारदर्शी पीपीई किट घालून हॉस्पिटलला गेली रशियन नर्स, अन्...

Web Title: Madhya pradesh kadaknath cock robbery capture in cctv myb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.