फेक आयडीने ऑनलाईन क्लासमध्ये प्रवेश घेतला अन् कॅमेऱ्यासमोर काढले कपडे...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2021 14:10 IST2021-07-18T14:09:30+5:302021-07-18T14:10:01+5:30
काहीवेळा मुलं अशा काही गोष्टी करतात की पालकांसोबत इतरही अवाक् होतात. अशावेळी पालकांना काय करावे समजत नाही. अशीच हे घटना मध्यप्रदेशातील भिंड गावात घडली आहे. येथील एका खाजगी महाविद्यालयातील विद्यार्थ्याने असे काही कृत्य केले की त्याच्या पालकांना आता तोंड दाखवेनासे झाले आहे.

फेक आयडीने ऑनलाईन क्लासमध्ये प्रवेश घेतला अन् कॅमेऱ्यासमोर काढले कपडे...
शिक्षणाचा अति ताण आणि सोशल मिडियाचा गैरवापर यामुळे मुलांचे मानसिक संतुलन दिवसेंदिवस बिघडत चालले आहे. काहीवेळा मुलं अशा काही गोष्टी करतात की पालकांसोबत इतरही अवाक् होतात. अशावेळी पालकांना काय करावे समजत नाही. अशीच हे घटना मध्यप्रदेशातील भिंड गावात घडली आहे. येथील एका खाजगी महाविद्यालयातील विद्यार्थ्याने असे काही कृत्य केले की त्याच्या पालकांना आता तोंड दाखवेनासे झाले आहे.
शिवपुरीमधील १२ चा विद्यार्थीच कॉलेजची ऑनलाईन क्लासची लिंक मिळवून फेक नावानं क्लास जॉईन करत होता. जेव्हा त्याचा टर्न आला तेव्हा तो कपडे काढून कॅमेऱ्यासमोर उभा राहिला.. यामुळे संपूर्ण क्लासमध्ये गोंधळ उडाला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीच्या एका मित्रालाही ताब्यात घेतलं आहे, जो त्याच कॉलेजचा विद्यार्थी आहे. हे दोघे एकत्र पबजी खेळत असत. याच खेळादरम्यान अश्लील कृत्य करणाऱ्या मित्रानं ऑनलाईन क्लासची लिंक घेतली. त्यानंतर फेक आयडी तयार करून ऑनलाईन क्लासमध्ये प्रवेश करत तो घाणेरडं कृत्य करू लागला.
पोलिसांनी याप्रकरणी FIR दाखल केली आहे. यानंतर आरोपी आणि त्याला लिंक देणारा कॉलेजचा विद्यार्थी या दोघांना शनिवारी रात्री ताब्यात घेण्यात आलं आहे. सध्या त्यांची चौकशी सुरू आहे.