शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
2
Top Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
3
Success Story: १०,००० पगार ते ४०० कोटींचा व्यवसाय, कसा होता ब्रॉडबँड सेवा पुरवणाऱ्या जम्मू काश्मीरच्या विवेक रैनांचा प्रवास?
4
गोरखपूर ट्रेन नाही, रत्नागिरी पॅसेंजरमुळे ८ लोकलला फटका; दादरला येणार की नाही? मध्य रेल्वे म्हणते…
5
होर्मुझचा तिढा सुटला नाहीय तोच समुद्रात अमेरिका-चीन एकमेकांविरोधात उभे ठाकले; पनामाचा वाद उफाळला... 
6
Ashok Kharat : भोंदू खरातने फरार पत्नीला माहेरी जाण्यासाठी १६ वर्ष रोखलं; नातेवाईकांचा धक्कादायक खुलासा
7
'पीएम किसान'चे २,००० रुपये खात्यात जमा होण्यासाठी 'या' ३ अटी पूर्ण करणे अनिवार्य; मोबाईलवरुनही प्रोसेस होईल
8
अमेरिकेचे F-35 विमान इराणने पाडले! १५ दिवसांत दुसऱ्या फायटर जेटचा गेम; युद्धभूमीवर खळबळ
9
आता इंधनाबरोबरच खतांचं टेन्शनही संपणार! संकट काळात 'खास मित्र' भारताच्या मदतीला, PM मोदींना भेटून दिलं मदतीचं आश्वासन
10
वर्षभरानंतर सतीश भोसले उर्फ 'खोक्या' तुरुंगाबाहेर; मारहाण प्रकरणात न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता
11
हृदयद्रावक! गॅस टंचाईमुळे अनेक रेस्टॉरंट्स बंद; काम न मिळाल्याने शेफची आत्महत्या
12
एक युद्धनौका, एक अण्वस्त्रवाहू पाणबुडी...! दोन्ही शिकारी जगापासून अदृष्यच राहणार, भारताच्या संरक्षण मंत्र्यांची पोस्ट अन् चीन, पाकिस्तानात खळबळ... 
13
पाकिस्तानला दुबईचा दणका! १७ एप्रिलपर्यंत २ अब्ज डॉलर्स परत करा; युएईच्या अल्टिमेटमने शाहबाज शरीफ सरकार हादरले
14
आपने केलेल्या कारवाईनंतर पहिल्यांदाच बोलले राघव चड्डा, म्हणाले, ‘’माझ्या मौनाला…” 
15
"होर्मुझमध्ये फक्त आमचेच नाविक मारले गेले..."; ६० देशांच्या बैठकीत भारत स्पष्टच बोलला, दिला मोठा इशारा!
16
सोने-प्लॅटिनमच्या आयातीवर कडक निर्बंध! आता 'लायसन्स'शिवाय इंपोर्ट अशक्य; दागिन्यांच्या किमती वाढणार?
17
भारत-पाकिस्तानच्या पडद्याआड चर्चा सुरू! 'ट्रॅक-2' बैठकीत दोन्ही देश आमनेसामने, कारण काय...
18
Numerology: तुमचा स्वभाव 'बोल्ड' आहे की लाजाळू? जन्मतारखेनुसार ओळखा बलस्थान,व्यक्तिमत्त्वाला द्या झळाळी!
19
नाशिकमध्ये हायप्रोफाईल ब्लॅकमेलिंग; जेष्ठ व्यक्तीच्या टॅबमधील 'त्या' अश्लील व्हिडिओसाठी १२ लाखांची खंडणी
20
Ashok Kharat : "कुटुंबात वाईट घटना, मृत्यूची भीती"; खरातने लाखो रुपये उकळलेले, कवडीमोल भावात जमीन खरेदी
Daily Top 2Weekly Top 5

जपानच्या समुद्रात सापडले 'रहस्यमय शहर', शास्त्रज्ञांच्या 'या' दाव्याने चर्चांना उधाण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 19:18 IST

काही जण याला ‘समुद्रात बुडलेले अटलांटिस’ किंवा प्राचीन मानवी सभ्यतेचा अवशेष मानतात.

योनागुनी बेट: तुम्ही श्रीकृष्णाच्या द्वारका शहराबद्दल ऐकले असेल. हजारो वर्षांपूर्वी द्वारका समुद्रात सामावून गेले. अशाच प्रकारचे एक शहर जपानच्या योनागुनी बेटाजवळ सापडले आहे. शास्त्रज्ञांना ६-२४ मीटर खोलीवर पायऱ्यांसारखी रचना आढळली, जी एका प्राचीन शहराच्या अवशेषांसारखी दिसते. 

काही जण याला ‘समुद्रात बुडलेले अटलांटिस’ किंवा प्राचीन मानवी सभ्यतेचा अवशेष मानतात. मात्र बहुसंख्य वैज्ञानिकांचे मत वेगळे आहे. ही रचना मानवनिर्मित नसून नैसर्गिक आहे. भूकंप किंवा भूर्भातील हालचालींमुळे तयार झाल्याचा दावा केला जातो.

रहस्याचा शोध कसा लागला?

1987 मध्ये डाइव्हिंग इन्स्ट्रक्टर किहाचिरो अराताके यांना योनागुनी बेटाजवळ पहिल्यांदा ही पायऱ्यांसारखी रचना दिसली. आकारमान पाहता ही रचना 50 मीटरहून अधिक लांब, 20-40 मीटर रुंद आणि 25 मीटर उंच आहे. दगडांवर पायऱ्या, प्लॅटफॉर्म आणि धारदार कोन दिसतात, ज्यामुळे ती पिरॅमिड किंवा राजवाड्यासारखी भासते.

मानवनिर्मित असल्याचा दावा

र्यूक्यू विद्यापीठ येथील भूवैज्ञानिक मसाकी किमुरा यांनी दीर्घकाळ अभ्यास करून, ही रचना सुमारे 10 हजार वर्षांपूर्वी मानवनिर्मित असल्याचा दावा केला. समुद्रपातळी वाढल्याने ती बुडाली, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यांच्या मते येथे ड्रेनेज प्रणाली, रस्ते, भिंती आणि चेहऱ्यासारखी कोरीवकामे दिसतात, म्हणूनच त्यांनी याला ‘जपानी अटलांटिस’ असेही संबोधले.

बहुसंख्य वैज्ञानिक काय म्हणतात?

मात्र, अनेक भूवैज्ञानिक उदा. बॉस्टन विद्यापीठ येथील रॉबर्ट शॉच (1997 मध्ये स्वतः पाहणी केली) ही रचना नैसर्गिक असल्याचे सांगतात. त्यांच्या मते हा परिसर भूकंपप्रवण आहे. येथे आढळणाऱ्या सँडस्टोन व मडस्टोन खडकांत आधीपासूनच सपाट थर व तडे असतात. भूकंपामुळे खडक नियमित पद्धतीने तुटतात, ज्यातून चौकोनी ब्लॉक्स व पायऱ्यांसारख्या आकृती तयार होतात.

समुद्री लाटा व प्रवाह तडे रुंद करतात आणि पृष्ठभाग गुळगुळीत करतात. जवळच्या जमिनीवरील अशाच खडकांवर वारा-पावसामुळे कडा गोलसर झाल्या; पाण्याखाली असल्याने येथे धारदार कडा टिकून राहिल्या, असे त्यांचे मत आहे. 2024 मध्ये क्यूशू विद्यापीठच्या भूवैज्ञानिकांनी कोणतेही पुरातत्त्वीय पुरावे (भांडी, हाडे, औजारे) न सापडल्याचे स्पष्ट केले. खडक तुटणे, घासणे व खड्डे पडणे, या प्रक्रिया आजही सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.

पृथ्वी अशी आकृती कशी घडवते?

जगभरात निसर्गाने घडवलेल्या अशा अनेक भूमितीय रचना आढळतात. 

जायंट्स कॉझवे (आयर्लंड): सहाकोनी स्तंभ

टेसलेटेड पेव्हमेंट (ऑस्ट्रेलिया): टाइल्ससारखी सपाट दगडी रचना

अल नसलाआ रॉक (सौदी अरेबिया): सरळ दुभंगलेला खडक

पल्पिट रॉक (नॉर्वे): सपाट, सरळ कडा

या सर्वांची निर्मिती टेक्टॉनिक ताण, तडे आणि इरोजनमुळे झाली आहे. योनागुनीही त्याच प्रक्रियेचा भाग असल्याचे वैज्ञानिकांचे मत आहे. याच वेगवेगळ्या मतांमुळे योनागुनी स्मारक आजही एक रहस्य बनले आहे. आजही जगभरातील डायव्हर्स येथे डायव्हिंग  करून या सौंदर्याचा अनुभव घेतात. 

English
हिंदी सारांश
Web Title : Yonaguni's Submerged Structures Spark Debate: Ancient City or Natural Formation?

Web Summary : Submerged off Yonaguni, Japan, lies a structure sparking debate. Some claim it's a lost city, akin to Atlantis. However, most scientists attribute the formation to natural seismic activity and erosion, not human construction, citing a lack of archaeological evidence.
टॅग्स :JapanजपानJara hatkeजरा हटके