शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
3
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
4
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
5
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
6
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
7
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
8
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
9
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
10
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
11
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
12
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
13
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
14
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
15
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
16
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
17
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
18
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
19
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

Lockdown: लय भारी! घरी जाण्यासाठी श्रमिक ट्रेनचं तिकीट न मिळाल्याने ‘या’ पठ्ठ्याने काय केलं पाहा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2020 08:44 IST

लल्लन सहपरिवार गावी जाण्यासाठी श्रमिक स्पेशल ट्रेनचं तिकीट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तीन दिवस प्रयत्न करुनही लल्लनला तिकीट मिळालं नाही,

ठळक मुद्दे३ दिवस स्टेशनवर राहूनही श्रमिक ट्रेनचं तिकीट न मिळाल्याने नाराज सगळी कमाई खर्च करुन खरेदी केली कार कुटुंबासह कारने मूळ गावी पोहचले सुरक्षित

नवी दिल्ली – कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी देशात गेल्या २ महिन्यापासून लॉकडाऊन सुरु आहे. या काळात मजुरांना आपापल्या घरी पाठवण्यासाठी रेल्वेकडून श्रमिक ट्रेन चालवण्यात येत आहे. मात्र लाखो मजुरांच्या तुलनेत सोडलेल्या काही मोजक्याच श्रमिक ट्रेन सोडल्याने अनेकांना घरी जाण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यातच लॉकडाऊन काळात अनेक अजब-गजब किस्से ऐकायला मिळाले.

काही मजूर कित्येक किमी पायी अंतर कापत होते, तर अनेकांनी घरी जाण्यासाठी वेगवेगळ्या मार्गाचा अवलंब केला. सध्या असाच एक किस्सा गाझियाबाद शहरात राहणाऱ्या पेंटर लल्लनसोबत घडला आहे. गोरखपूरला राहणाऱ्या लल्लनला लॉकडाऊनकाळात घरी जायचं होतं. लॉकडाऊनमध्ये पहिल्या दोन टप्प्यात काहीच व्यवस्था नव्हती मात्र तिसऱ्या टप्प्यात सरकारने मजुरांसाठी विशेष ट्रेन सुरु केल्या. त्यानंतर लल्लनच्या मनात घरी जाण्याची ओढ लागली.

लल्लन सहपरिवार गावी जाण्यासाठी श्रमिक स्पेशल ट्रेनचं तिकीट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तीन दिवस प्रयत्न करुनही लल्लनला तिकीट मिळालं नाही, त्यामुळे त्याने घरी जाण्याची दृढ निश्चयच केला. तीन दिवस वाट पाहूनही तिकीट न मिळाल्याने चौथ्या दिवशी लल्लन बँकेत गेला आणि १ लाख ९० रुपये काढून आणले. त्यानंतर सेकंड हँड कार खरेदी करण्यासाठी मार्केटला दिला. त्याठिकाणी दीड लाखात त्याने कार खरेदी केली आणि कुटुंबाला घेऊन गोरखपूरला त्याच्या गावी परतला. यानंतर पुन्हा गाव सोडून जाणार नाही अशी शपथच त्याने घेतली.

याबाबत लल्लनने सांगितले  की, बसमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होती, कुटुंबाला कोरोनाची लागण होण्याचा धोका होता. श्रमिक ट्रेनने घरी जाण्यासाठी प्रयत्न केला परंतु तोदेखील यशस्वी झाला नाही, त्यामुळे बचत केलेल्या पैशातून एक कार खरेदी केली आणि गावी परत आलो. कुटुंबाला गोरखपूरला पुन्हा आणण्यासाठी संपूर्ण आयुष्याची कमाई खर्च केली पण माझं कुटुंब सुरक्षित राहिलं याचा आनंद आहे असं तो म्हणाला. लॉकडाऊन काळात असे बरेच किस्से लोकांसाठी सध्या चर्चेचा विषय बनले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याrailwayरेल्वे