भारतातील या मंदिरात लावलं होतं 52 टनाचं चुंबक, खेचून घेत होतं मोठाले जहाज!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2023 18:09 IST2023-02-27T18:07:03+5:302023-02-27T18:09:28+5:30

Interesting Facts : भारतातील या मंदिराचा समावेश युनेस्कोने वर्ल्ड हेरिटेजमध्ये केला आहे. असे म्हणतात की, या विशाल मंदिरात ५२ टन वजनाचं विशाल चुंबक लावण्यात आलं होतं.

Konark sun temple : Interesting facts about Konark sun temple | भारतातील या मंदिरात लावलं होतं 52 टनाचं चुंबक, खेचून घेत होतं मोठाले जहाज!

भारतातील या मंदिरात लावलं होतं 52 टनाचं चुंबक, खेचून घेत होतं मोठाले जहाज!

Interesting Facts : भारतात शेकडो-हजारो मंदिरं आहेत. प्रत्येक एक मंदिराची आपली वेगळी कहाणी, आपला इतिहास आहे. परदेशातील जास्तीत जास्त लोक भारतात ऐतिहासिक मंदिरं बघण्यासाठीच येतात. या मंदिरांबाबत अनेक रहस्यमय कथा आहे ज्या वाचून थक्क व्हायला होतं. अशाच एका मंदिराची कहाणी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

हे मंदिर आहे कोणार्क मंदिर म्हणजेच सूर्य मंदिर. या मंदिरावर ५२ टन वजनाचं लोहचुंबक लावण्यात आलं आहे. हे मंदिर खूपच प्रसिद्ध आहे. कोणार्क मंदिराच्या गर्भगृहातील सूर्य देवाचं प्रत्यक्षात दर्शन करण्याचं भाग्य कमीच लोकांना मिळतं. 

भारतातील या मंदिराचा समावेश युनेस्कोने वर्ल्ड हेरिटेजमध्ये केला आहे. असे म्हणतात की, या विशाल मंदिरात ५२ टन वजनाचं विशाल चुंबक लावण्यात आलं होतं. पौराणिक कथांनुसार, सूर्य मंदिराच्या शिखरावर ५२ टनाचा चुंबकीय दगड लावला होता. याने समुद्रामुळे होणाऱ्या समस्या कमी व्हायच्या. ज्यामुळेच हे मंदिर शेकडो वर्षांपासून ताठ मानेने उभे आहे. तसेच या मंदिराचं मुख्य चुंबक इतर चुंबकांसोबत असं जोडलेलं होतं की, मंदिरातील मूर्ती हवेत तरंगती दिसत होती.

पण मंदिराची ही शक्तीशाली चुंबकीय व्यवस्था आधुनिक काळाच्या सुरूवातीला एक समस्या होऊ लागली. चुंबकीय शक्ती इतकी प्रभावी होती की, समुद्रातील जहाजे मंदिराकडे खेचले जात होते. इंग्रजांच्या काळात याने त्यांना नुकसान होऊ लागलं होतं. त्यामुळे त्यांनी मंदिरातील चुंबक काढून टाकलं. पण याने जे झालं, त्याचा अंदाज कुणालाच नव्हता.

हे मंदिर चुंबकीय व्यवस्थेनुसार तयार करण्यात आलं होतं. विशालकाय चुंबक काढल्यानंतर मंदिराचं संतुलन बिघडलं. ज्यामुळे मंदिराच्या अनेक भिंती आणि दगडं पडू लागलेत.

ओडीशाच्या पुरी जिल्ह्यात असलेलं हे मंदिर चंद्रभागा नदीच्या किनाऱ्यावर आहे. याला सूर्य मंदिर असंही म्हटलं जातं. अद्भूत कलाकृतीचा नमूना असलेलं हे मंदिर अनेक दृष्टीने वेगळं आहे. या मंदिराची कल्पना सूर्याच्या रथाप्रमाणे करण्यात आली आहे. या रथाला १२ चाके आहेत आणि त्यावर सुंदर कलाकृती आहे.

Web Title: Konark sun temple : Interesting facts about Konark sun temple