Japan Man Viral Image: जगात असे अनेक लोक आहेत, जे काही ना काही कारणांमुळे चर्चेत येतात. अशीच एक व्यक्ती जपानमध्ये आहे, जी सध्या सर्वांच्या चर्चेचा विषय ठरत आहे. वास्तविक, जपानमधील ही व्यक्ती श्वान बनली आहे. हे ऐकायला खूप विचित्र वाटेल, पण हे अगदी खरं आहे. हे सर्व कसं झालं ते पाहूया.
मिळालेल्या माहितीनुसार, जपानमधील या व्यक्तीचे नाव टोको आहे. या व्यक्तीला श्वानासारखे दिसणे इतके आवडते की त्याने यासाठी तब्बल ११ लाख रुपये खर्च केले. इतके पैसे खर्च करून त्याने असा पोशाख बनवला आहे, जो परिधान करून तो अगदी एखाद्या श्वानाप्रमाणे त्र्दिसतो. त्याला कोणी ओळखू शकत नाही. टोकोने आपल्या ट्विटर हँडलवरून हे नवं रुप धारण केल्यानंतरचे फोटोही शेअर केले आहेत.
४० दिवसांत पोषाख तयारया पोषाखात त्याला ओळखणंही कठीण आहे. तसंच Zeppet कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार तो पोषाख तयार करताना सिंथेटिक मटेरिअलचा वापर करण्यात आला आहे. कंपनीला हा पोषाख तयार करण्यास ४० दिवसांचा कालावधी लागला. कंपनीनं यासाठी २ मिलियन येन म्हणजेच जवळपास ११ लाख ६३ हजार रुपये आकारले.