डॉक्टरांच्या चिठ्ठीवर लिहिलेल्या कोडवर्ड्सचा अर्थ माहीत आहे का? नसेल माहीत तर जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2021 02:01 PM2021-09-11T14:01:44+5:302021-09-11T14:04:59+5:30

औषधांच्या चिठ्ठीवर लिहिलेल्या या कोडबाबत तुम्हाला माहीत असेल तर तुम्हाला मूर्ख बनवू शकणार नाहीत.

Know about code used by doctor in prescription | डॉक्टरांच्या चिठ्ठीवर लिहिलेल्या कोडवर्ड्सचा अर्थ माहीत आहे का? नसेल माहीत तर जाणून घ्या

डॉक्टरांच्या चिठ्ठीवर लिहिलेल्या कोडवर्ड्सचा अर्थ माहीत आहे का? नसेल माहीत तर जाणून घ्या

googlenewsNext

डॉक्टरकडून आल्यावर प्रत्येक घरात एक गोष्ट नेहमीच बोलली जाते की, डॉक्टरने चिठ्ठीत काय लिहिलं समजलं नाही? मुळात डॉक्टर काही कोडचा वापर करतात जे केवळ डॉक्टर आणि मेडिकल स्टोरवाल्यांनाच माहीत असतात. जास्तीत जास्त लोकांना डॉक्टरने काय लिहिलं हे कळत नाही आणि मग त्यावरून चिडचिड होते. पण आता आम्ही डॉक्टरकडून चिठ्ठीवर लिहिण्यात येणाऱ्या कोडबाबत सांगणार आहोत. म्हणजे तुमची चिडचिड होणार  नाही.

डॉक्टर त्यांच्या प्रिस्क्रिप्शनवर जे लिहितात ते त्यांचे सीक्रेट कोड असतात. जे सामान्य लोकांना समजणं अवघड असतं. 
औषधांच्या चिठ्ठीवर लिहिलेल्या या कोडबाबत तुम्हाला माहीत असेल तर तुम्हाला मूर्ख बनवू शकणार नाहीत. जर प्रिस्क्रिप्शनवर Rx लिहिलं असेल तर त्याचा अर्थ उपचार असा होतो आणि qD चा अर्थ दररोज, qOD चा अर्थ प्रत्येक एक दिवस सोडून, qH चा अर्थ प्रत्येक तासाला, S चा अर्थ च्याशिवाय आणि C चा अर्थ च्यासोबत. (हे पण वाचा : टॅबलेटच्या पॅकेटवर लाल रंगाची रेष का असते? माहीत नसेल तर होईल मोठं नुकसान)

त्यासोबतच डॉक्टर त्यांच्या प्रिस्क्रिप्शनवर अनेकदा SOS लिहितात. याचा अर्थ असा होतो की,औषध तेव्हाच खायचं आहे जेव्हा कोणत्या प्रकारची इमरजन्सी असेल किंवा जास्त त्रास होत असेल. AC चा अर्थ जेवणाआधी, PC चा अर्थ जेवणानंतर, BID चा अर्थ दिवसातून दोनदा, TID चा अर्थ दिवसातून तीन वेळा आणि PO चा अर्थ होतो की, औषध इंजेक्शन किंवा कोणत्या वेगळ्या प्रकारे घ्यायचं नाही. हे औषध केवळ पाण्यासोबत घ्यायचं आहे. 

प्रिस्क्रीप्शनवर लिहिलेल्या Ad Lib चा अर्थ होतो की, डॉक्टरने जेवढ्या प्रमाणात औषध घ्यायला सांगितलं तेवढंच औषध घ्यायचं आहे. ड्रॉप्सच्या औषधांसाठी डॉक्टरांचा सीक्रेट कोड GTT असा असतो. इतकंच नाही तर Tw चा अर्थ आठवड्यातून दोनदा, QAM चा अर्थ रोज सकाळी, QP चा अर्थ प्रत्येक रात्री, Q4H चा अर्था दर चार तासांनी, HS चा अर्थ झोपताना आणि PRN चा अर्थ गरजेनुसार औषध घेणं असा होतो. (हे पण वाचा : टॅबलेट्सच्या पॅकेटवर रिकामी स्पेस का दिलेली असते? कधी केलाय का विचार तुम्ही....)

जर डॉक्टरच्या प्रिस्क्रीप्शनवर bd किंवा bds लिहिलेलं असतं तर त्याचा अर्थ होतो की, औषध केवळ दोनदा घ्यायचं आहे. त्यासोबच TDS चा अर्थ औषध तीनवेळा घ्यायचं आहे, QTDS चा अर्थ औषध दिवसातून चार वेळा घ्यायचं आहे, OD चा अर्थ दिवसातून एकदा, BT चा अर्थ झोपताना आणि BBF चा अर्थ नाश्त्याआधी.
 

Web Title: Know about code used by doctor in prescription

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.