इथे लग्नात केला जातो एक अजब रिवाज, नवरीला 'किस' करतात लग्नातील तरूण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2024 10:49 AM2024-06-22T10:49:01+5:302024-06-22T12:56:26+5:30

ख्रिश्चन लग्नामध्ये लग्न पार पडल्यावर नवरी-नवरदेव एकमेकांना किस करतात. पण स्वीडनमध्ये त्यांच्यात एक वेगळाच रिवाज आहे.  

Kissing Tradition Sweden in marriage | इथे लग्नात केला जातो एक अजब रिवाज, नवरीला 'किस' करतात लग्नातील तरूण

इथे लग्नात केला जातो एक अजब रिवाज, नवरीला 'किस' करतात लग्नातील तरूण

वेगवेगळ्या देशांमध्ये लग्नाचे वेगवेगळे रिती-रिवाज असतात. आपल्या देशातही वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळे रितीरिवाज असतात. परदेशात काही ठिकाणी लग्नाचे वेगवेगळे अजब रिवाज असतात. काही तर असे असतात ज्यांवर विश्वासही बसत नाही. आज आपण अशाच एका लग्नाच्या रिवाजाबाबत जाणून घेणार आहोत. कदाचित तुम्ही या रिवाजाबाबत ऐकलंही नसेल. सामान्यपणे तुम्ही पाहिलं असेल की, ख्रिश्चन लग्नामध्ये लग्न पार पडल्यावर नवरी-नवरदेव एकमेकांना किस करतात. पण स्वीडनमध्ये त्यांच्यात एक वेगळाच रिवाज आहे.  

नवरदेवाचे मित्र नवरीला करतात किस

स्वीडनमध्ये लग्नादरम्यान एक अनोखी परंपरा पार पाडली जाते. इथे लग्नादरम्यान नवरी-नवरदेव एकमेकांना किस करत नाही. इथे नवरदेवाचे मित्र नवरीला किस करतात आणि नवरीच्या मैत्रिणी नवरदेवाला किस करतात.

नवरीला सोडून जातो नवरदेव

या रिवाजात नवरदेव आपल्या नवरीला मंडपात सोडून जातो. मग लग्नात आलेले तरूण आणि अविवाहित पुरूष नवरीला किस करतात. अशात नवरदेवाला सुद्धा तरूणी आणि अविवाहित महिला किस करतात. या रिवाजाला सुखी जीवनाची सुरूवात अशा रूपात पाहिलं जातं.

हा रिवाज जरा अजबच आहे. पण स्वीडनमध्ये होणाऱ्या ख्रिश्चन लग्नांमध्ये हा रिवाज पाळला जातो. नवरी-नवरदेवाच्या परिवारातील कुणाचाही यावर आक्षेप नसतो. ही तिथे फार सामान्य परंपरा आहे. पण आपल्याकडील लोकांना नक्कीच ही परंपरा अजब वाटू शकते.
     

Web Title: Kissing Tradition Sweden in marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.