पार्किंगमध्ये उभ्या कारमध्ये सापडला 30 किलो वजनाचा किंग कोब्रा, व्हिडीओ बघून व्हाल हैराण
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2023 13:37 IST2023-01-09T13:35:56+5:302023-01-09T13:37:16+5:30
King Cobra Snake: पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या कारमध्ये एक विशा किंग कोब्रा (King Cobra) आढळून आला. पलक्कड़च्या वडकनचेरीमध्ये राहणाऱ्या कुंजुमनच्या पार्किंगमध्ये उभ्या कारमध्ये हा साप शिरला होता.

पार्किंगमध्ये उभ्या कारमध्ये सापडला 30 किलो वजनाचा किंग कोब्रा, व्हिडीओ बघून व्हाल हैराण
King Cobra Snake: सामान्यपणे लोक त्यांची गाडी पार्किंगमध्ये पार्क करतात आणि काम असेल तेव्हा गाडी काढून निघून जातात. पण असं करत असताना तुम्ही जरा काळजी घ्यायला हवी. कारण केरळच्या पलक्कडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या कारमध्ये एक विशा किंग कोब्रा (King Cobra) आढळून आला. पलक्कड़च्या वडकनचेरीमध्ये राहणाऱ्या कुंजुमनच्या पार्किंगमध्ये उभ्या कारमध्ये हा साप शिरला होता.
मीडिया रिपोर्टनुसार, दोन तासांपेक्षा जास्त वेळानंतर किंग कोब्राला पकडण्यात आलं. हा साप वडकनचेरी वन प्रबंधन दलाच्या नेतृत्वात सर्पमित्र मुहम्मद अली यांनी पकडला. किंग कोब्रा (King Cobra) चं वजन साधारण 30 किलो होतं.
सांगण्यात आलं आहे की, बऱ्याच दिवसांपासून कारचा वापर करण्यात आला नव्हता. पण कारमधून वेगळाच आवाज येत असल्याने कुंजुमनने कारचं निरीक्षण केलं. त्यानंतर त्यांना कारमध्ये किंग कोब्रा आढळून आला. त्यांनी लगेच वन विभागाला सूचना दिली.
नंतर कुंजुमनने सापाला बाहेर काढण्यासाठी कारचा दरवाजा उघडला. पण काही फायदा झाला नाही. त्यानंतर लगेच वन विभागाचे अधिकारी पोहोचले आणि क्रॉलरच्या माध्यमातून साप पकडण्यात आला. या घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे.