Shocking Video! पाचव्या मजल्यावरून चिमुकला खाली पडत होता, 'त्याने' हिरोसारखं येऊन केलं कॅच!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2020 13:31 IST2020-07-17T13:30:51+5:302020-07-17T13:31:32+5:30
द सनने दिलेल्या वृत्तानुसार, ९ जुलैला २ वर्षीय मुलाने स्वत:ला बेडरूममध्ये लॉक करून घेतलं. नंतर एका स्टूलच्या मदतीने खिडकीपर्यंत पोहोचला.

Shocking Video! पाचव्या मजल्यावरून चिमुकला खाली पडत होता, 'त्याने' हिरोसारखं येऊन केलं कॅच!
हा व्हिडीओ पाहून लोकांच्या हृदयाची धडधड वाढली. ही घटना आहे पूर्व चीनच्या जिआंगसु प्रांतातील. येथील हुइआन शहरातील जुयई काउंटीमध्ये एका लहान मुलगा इमारतीच्या पाचव्या मजल्याच्या खिडकीतून खाली लटकला. सुदैवाने शेजाऱ्याने वेळीच त्याचा जीव वाचवला. द सनने दिलेल्या वृत्तानुसार, ९ जुलैला २ वर्षीय मुलाने स्वत:ला बेडरूममध्ये लॉक करून घेतलं. नंतर एका स्टूलच्या मदतीने खिडकीपर्यंत पोहोचला आणि बाहेर लागलेल्या एअर कंडीशन यूनिटला पकडून लटकला.
जेव्हा शेजारी Li Dehai ने चिमुकल्याला हवेत झुलताना पाहिले आणि लगेत सतर्क झाला. त्याने सांगितले की, 'जेव्हा मी त्याला लटकताना पाहिले तेव्हा मी एक ब्लॅंकेट घेऊन आलो आणि चार लोकांसोबत त्याला झेलण्याासाठी उभा झालो. दरम्यान माझी नजर एका काचेवर पडली. तो त्या काचेवर पडला असता तर जखमी झाला असता. त्यामुळे ती काच मी झाकली. आणखी एक जाड ब्लॅकेट आणलं.
बऱ्याच वेळाने जेव्हा मुलाची पकड सैल झाली तेव्हा तो हवेत झुलत खाली पडू लागला होता. पण Li Dehai ने त्याला एखाद्या हिरोप्रमाणे कॅच केलं. त्यानंतर त्याला लगेच काउंची ह़ॉस्पिटलला घेऊन गेले. डॉक्टरांनी तो पूर्णपणे सुरक्षित असल्याचं सांगितलं. व्हिडीओत बघितलं जाऊ शकतं की, जेव्हा Li Dehai मुलाला कॅच केलं तेव्हा ते एका स्टूलवर उभे होते.
Li Dehai याचं सोशल मीडियातून भरभरून कौतुक केलं जातंय. दरम्यान त्या मुलाचा जीव वाचवताना त्यांना थोडी जखमही झाली आहे. येथील पोलिसांनी Li Dehai यांची माहिती काढली आणि त्यांना सन्मानित केले.
बोंबला! मजा म्हणून त्याने घरात कुणी नसताना केला 'हा' कारनामा, डॉक्टर एक्स-रे पाहून झालेत हैराण....
बाबो! आज घरबसल्या महिन्याला ७५ लाख रूपये करते कमाई, कधी 'या' कारणाने आत्महत्येचा करत होती विचार!