कुत्रा हा प्राणी आपल्या इमानदार आणि प्रेमळ स्वभावामुळे नेहमीच लळा लावत असतो. नेहमी आसपास दिसणारा कुत्रा अचानक दिसणं बंद झाल्याने अनेकांना अस्वस्थ व्हायला होतं. तसंच पाळीव प्राण्यांना सुद्धा नेहमी आपली देखभाल करत असलेल्या, आपल्याशीा खेळणाऱ्या  मालकांचा प्रचंड लळा लागलेला असतो. कानपूरमध्ये एक अशीच घटना घडली आहे. ही घटना वाचून नक्कीच तुमच्या डोळ्यात पाणी येईल. कानपूरच्या मलिकपुरम येथे राहत असलेल्या एका कुत्रीने आपल्या मालकिणीची मृत्यूनंतर स्वतःचं जीवनही संपवलं आहे. घराच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारत कुत्रीने जीव दिला आहे. 

डॉ. अनीता

मलिकपुरम येथे राहत असलेले डॉ. राजकुमार सचान हमीरपुरमध्ये मुख्य वैद्यकिय अधिकारी पदावर होते.  त्यांची पत्नीसुद्धा शहारातील आरोग्य विभागात ज्वाइंट डायरेक्टरच्या पदावर होत्या. किडनीच्या आजारामुळे त्यांना आठवडाभर आधी रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं. पण बुधवारी त्यांचा मृत्यू झाला. 

जया का शव

मुलगा तेजस आणि मुलगी जान्हवी मृतदेहासह घरी पोहोचले. त्यानंतर त्यांच्या घरातील कुत्री मालकिणीचा मृतदेह पाहून प्रचंड व्यथित झाली. त्यानंतर तेजसने या कुत्रीला घराच्या दुसऱ्या मजल्यावर बंद केले. त्यानंतर झटापट करून ही कुत्री  चौथ्या मजल्यावर पोहोचली आणि उंचावरून उडी मारत आपले जीवन संपवले.

यहीं से कूदकर जया ने दी जान

हे घटना कळल्यानंतर आजूबाजूला राहत असलेल्या सगळ्यांचे डोळे पाणावले. जया या कुत्रीचे शव सुद्धा मालकिणीच्या मृतदेहाशेजारी ठेवण्यात आलं. या महिलेसोबतच कुत्रीचेही अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे परिसरात प्रचंड दुखांचे वातावरण निर्माण झाले आहे.

'त्या' एका घटनेमुळं बदललं आयुष्य अन् बनली आयपीएस अधिकारी! 


९७ किलोच्या धावपटू बाहुबलीची कोरोनाने केली 'अशी' अवस्था; स्वःतला ओळखणंही झालं कठीण

Web Title: kanpur female dog jumps to death after seeing deadbody of her owner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.