शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिस्ट आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
4
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
5
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
6
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
7
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
8
Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज
9
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
10
अनिल अंबानींच्या ३०३४ कोटींच्या संपत्तीवर टाच; फ्लॅटपासून ते फार्महाऊस पर्यंत काय काय जप्त?
11
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
12
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स ३५० अंकांनी, तर निफ्टी १०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्सवर आज नजर
13
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
14
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
15
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
16
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
17
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
18
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
19
उन्हामुळे शरीराचे ‘हे’ तीन अवयव होऊ शकतात निकामी; डॉक्टरांनी दिले ६ खास सल्ले, जाणून घ्या
20
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
Daily Top 2Weekly Top 5

बंगालमध्ये लग्नानंतरच्या पहिल्या रात्री पाळली जाते विचित्र प्रथा, वाचून व्हाल अवाक्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2019 11:38 IST

लग्न ही कोणत्याही मुला-मुलीच्या जीवनातील सर्वात मोठी गोष्ट असते. कारण लग्नानंतर त्यांचं संपूर्ण जीवन बदलणार असतं. यात मुलीच्या आयुष्यात सर्वात जास्त बदल होतात.

लग्न ही कोणत्याही मुला-मुलीच्या जीवनातील सर्वात मोठी गोष्ट असते. कारण लग्नानंतर त्यांचं संपूर्ण जीवन बदलणार असतं. यात मुलीच्या आयुष्यात सर्वात जास्त बदल होतात. लग्न म्हटलं की, मुला-मुलीमध्ये सर्वात जास्त उत्सुकता असते ती, पहिल्या रात्रीची. जगभरात पहिल्या रात्रीच्या वेगवेगळ्या प्रथा आहेत. अशीच एक प्रथा बंगाली लोकांमध्ये असते. ही प्रथा फारच वेगळी आहे. पहिल्या रात्रीला इथे काळरात्र म्हटली जाते. म्हणजे ही रात्र अशुभ मानली जाते.

बंगाली प्रथेनुसार या लग्नानंतरच्या पहिल्या रात्री जोडप्याला एकत्र राहता येत नाही. त्यांना वेगवेगळं रहावं लागतं. याचं काय कारण असेल? असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच.  तर याबाबत एक दंतकथा सांगितली जाते. त्या कथेनुसार ही रात्र काळरात्र मानली जाते.

अशी मान्यता आहे की, भगवान शंकराची मुलगी मनसा ही सर्प देवता होती. पण तिची देवांसारखी पूजा केली जात नव्हती. त्यासाठी ती अनेक प्रयत्न करायची. पण तिला फारसं यश आलं नाही. तिने चांग सौदागर नावाच्या श्रीमंत व्यापाऱ्याला सांगितलं की, माझी देवता म्हणून पूजा कर. पण त्याने नकार दिला. मनसाने त्याला श्राप दिला. याने त्याच्या जहाजे समुद्रात बुडाली आणि सहा मुलांचा मृत्यू देखील झाला.

पण तरीही त्याने काही मनसाची पूजा करणं मान्य केलं नाही. त्यानंतर चांद सौदागरच्या लहान मुलाचं लग्न होतं. मनसाने श्राप दिला होता की, जेव्हा नवविवाहित जोडपं सोबत पहिली रात्र घालवेल तेव्हा नवरदेवाचा सर्प दंशाने मृत्यू होईल. झालंही तसंच. चांद सौदागरच्या लहान मुलाचा पहिल्या रात्रीच मृत्यू झला. 

पण चांद सौदागरचा लहान मुलगा लखिंदरची पत्नी बेहुलाला तिचा पती परत हवा होता. अनेक प्रयत्नांनंतर बेहुला मनसाला भेटू शकली. बेहुलाची स्थिती पाहून मनसाची सावत्र आई पार्वतीने मनसाला आदेश दिला की, बेहुलाच्या पतीला जीवनदान दे. 

(Image Credit ; indiagramnews.com)

मनसाने हा आदेश स्वीकारला. पण एक अट बेहुला समोर ठेवली. ती अट होती की, चांद सौदागरने मनसाचा स्वीकार देवी म्हणून करावा आणि तिची पूजा करावी. गमावलेली सगळी संपत्ती, मुलं परत मिळणार हे पाहून चांद सौदागरने मनसाचा देवी म्हणून स्वीकार केला. नंतर सगळे आनंदाने राहू लागले. तेव्हापासूनच लग्नाची पहिली रात्र काळरात्र म्हणून पाळली जाते. त्यामुळे आजही नवविवाहित जोडपं पहिल्या रात्री वेगळं राहतं.

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके