शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

तरुणाचा अफलातून जुगाड, दुचाकीनं चालणारी Ambulance केली तयार; IPS ऑफिसर म्हणाले..., पाहा Video

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2021 16:50 IST

हा व्हिडिओ आयपीएस अधिकारी रुपिन शर्मा (Rupin Sharma, IPS) यांनी सोशल मिडियावर शेअर केला आहे.

नवी दिल्ली - आपला देश जुगाड करण्याच्या बाबतीत संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. जेव्हा एखादे काम अडते, तेव्हा लोक ते काम पूर्ण करण्यासाठी काही ना काही जुगाड नक्कीच करताना दिसतात. हल्ली तर सोशल मिडियावरही असे जुगाड केलेले व्हिडिओ सातत्याने व्हायरल होत असतात. अनेक वेळा तर, असेही व्हिडिओ समोर येतात, जे पाहून आपणही अवाक होत असाल. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. यात एका व्यक्तीने देशी जुगाड वापरून दुचाकीने चालणारी अॅम्ब्युलन्स तयार केली आहे. हा व्हिडिओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. (Jugaad Man made ambulance with bike internet users loves it IPS share video)

हा व्हिडिओ आयपीएस अधिकारी रुपिन शर्मा (Rupin Sharma, IPS) यांनी सोशल मिडियावर शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना त्यांनी लिहिले आहे, ‘भारतीय शोध.' या व्हिडिओत आपण पाहू शकता, की एका व्यक्तीने दुचाकीला जोडलेली एक अॅम्ब्युलन्स तयार केली आहे. यात तो एका महिलेला झोपवून घेऊन जात आहे. हा व्हिडिओ ओडिशातील असल्याचे सांगण्यात येत आहे. लोकही या तरुणाने केलेल्या या जुगाडाचे कोतुक करत आहेत. 

२५ लाख रूपये खर्चून स्कूल बसला बनवलं लक्झरी घर, घर असं की बघतंच रहावं!

Video : आधी ४ जण जबरदस्ती बाईकवर बसले; पाचव्याला अडजस्ट करण्यासाठी केला भन्नाट जुगाड

हा व्हिडिओ आतापर्यंत 25 हजारहून अधिक लोकांनी पाहिला आहे. या व्हिडिओवर लोक गमतीशीर प्रतिक्रियाही देत आहेत आणि याच बरोबर, ही अॅम्ब्युलन्स तयार करणाऱ्या व्यक्तीची तारीफही करत आहेत. एका यूझरने लिहिले आहे, ‘हा आहे माझा अद्भुत देश'. एकाने लिहिले आहे, ‘खूपच छान'. आणखी एका युझरने तर लिहिले आहे, "जगात काय मिळत नाही... आणि सापडूनही भारतीय डोक सापडत नाही... खुपच छान जुगाड..."

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेhospitalहॉस्पिटलTwitterट्विटर