झक्कास ऑफर! 'या' तरूणाला गर्लफ्रेंड मिळवून द्याल तर १८ लाख मिळवाल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2020 14:36 IST2020-02-20T13:17:52+5:302020-02-20T14:36:36+5:30
हा व्यक्ती रिलेशनशीपमध्ये असताना खूप ओपन माईंडेड राहणारा आणि पार्टनरला सर्पोट करणारा आणि हसत खेळत राहणारा आहे.

झक्कास ऑफर! 'या' तरूणाला गर्लफ्रेंड मिळवून द्याल तर १८ लाख मिळवाल!
(image credit-hack spirit)
अमेरिकेच्या एका बिजनेसमॅनने गर्लफ्रेंन्ड शोधण्यासाठी एक खास बेबसाईट तयार केली आहे. या साईटच्या माध्यमातून जेफ गेबहार्ट या व्यक्तीला जर तुम्ही गर्लफ्रेंड शोधून दिलीत तर तुम्हाला १७ लाख ९२ हजार रूपायांचे बक्षिस मिळणार आहे. अशी वेबसाईट सुरू केलेल्या व्यक्तीचं नाव जेफ गेबहार्टला आहे. ४७ वर्षीय जेफ गेबहार्टला अशी मुलगी हवी आहे जी त्याच्या चांगल्या आणि वाईट दोन्ही परिस्थितीत आणि प्रसंगात नेहमी त्याच्या सोबत राहील.
(image credit- the daily caller)
जेफ असं सांगतो की तो ट्रेडिशनल डेटिंग करून थकला आहे तसंच तो ऑनलाईन डेटिंग करून सुद्धा बोअर झाला आहे. म्हणूनच त्याने पैसे मिळवून देणारी आईडिया शोधून काढली आहे. ही वेबसाईट मागच्या आठवड्यात सुरू झाली. हा व्यक्ती रिलेशनशीपमध्ये असताना खूप ओपन माईंडेड राहणारा आणि पार्टनरला सर्पोट करणारा आणि हसत खेळत राहणारा आहे. त्याला असं वाटतं की त्याच्या पार्टनरने सुद्धा तो जसा आहे तसा त्याचा स्वीकार करावा.
कॉन्फिडंट आणि विनोदी स्वभावाची मुलगी याला गर्लफ्रेंड म्हणून हवी आहे. त्याच्या आवडीनिवडींना तीने स्वीकारायला हवं, खूप सकारात्मक आणि इतरांना सुद्धा समजून घेईल अशी मुलगी शोधण्याच्या प्रयत्नात तो आहे आणि अशी मुलगी शोधून देत असलेल्या व्यक्तीला जेफ हे बक्षिस देणार आहे. ( हे पण वाचा-आश्चर्य! ब्रेन ट्यूमरची सर्जरी सुरू असताना 'ती' चक्क वाजवत होती व्हायोलिन, व्हिडीओ व्हायरल!)
या कॅम्पेनचा हेतू योग्य मुलगी शोधण्याचा आहे
सध्यातरी जेफची ही गर्लफ्रेंड शोध मोहीम कधीपर्यंत चालू राहणार आहे. याबद्दल काहीही कल्पना नाही. पण यात सिलेक्ट होणं सुद्धा सोप नाही. जेफची गर्लफ्रेंड होण्यासाठी जी मुलगी तयार होईल ती २५ हजार डॉलरची घेण्यास पात्र असेलचं असं नाही.यासाठी वेबसाईटवर जाऊन आधी अप्लाय करावं लागणार आहे. त्यानंतर एक ऑनलाईन सर्वे पूर्ण करावा लागेल. हा सर्वे क्लिनिकल मनोविज्ञानिकांनी तयार केला आहे. यातुन मुलींना न बघताच जेफला त्यांच्याबद्दल कळेल. त्यानंतर पुढची प्रकिया सुरू होईल. ( हे पण वाचा-तुम्ही कधी पांढरी दुर्मीळ मगर पाहिली का? नसेल पाहिली तर आता बघा...तिचा थाट पाहून व्हाल अवाक्....)