शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

'या' जपानच्या डॉन जुआनने केला होता ४ हजार महिलांसोबत संबंध ठेवल्याचा दावा, 'शेवटच्या' पत्नीने विष देऊन संपवलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2021 17:15 IST

डॉन जुआन उर्फ कोसुके नोजाकी जपानमधील मोठ्या बिझनेसमनपैकी एक होते. नोजाकीचा रिअल इस्टेट आणि दारूचा व्यवसाय होता. 

जपानमधील एक अब्जाधिश बिझनेसमनच्या तरूण पत्नीला अटक करण्यात आली आहे. २५ वर्षीय सुडोवर आरोप आहे की, तिने तिच्या ७७ वर्षीय पती 'डॉन जुआन'ची हत्या केली. रिपोर्ट्सनुसार, महिलेने डॉन जुआनसोबत लग्न केल्यावर केवळ तीन महिन्यात विष देऊन त्याची हत्या केली होती. डॉन जुआन उर्फ कोसुके नोजाकी जपानमधील मोठ्या बिझनेसमनपैकी एक होते. नोजाकीचा रिअल इस्टेट आणि दारूचा व्यवसाय होता. 

तीन वर्षाआधी मे महिन्यात त्यांचा मृत्यू झाला होता आणि त्यांच्या शरीरात घातक ड्रग्स आढळून आलं होतं. मृत्यूआधी ते त्यांच्या पत्नीसोबत होते. नोजाकी हे सर्वातआधी २०१६ मध्ये चर्चेत आले होते जेव्हा त्यांनी आत्मचरित्र छापलं होतं. यात त्यांनी दावा केला होता की, त्यांनी ४ हजार महिलांसोबत शरीर संबंध ठेवले आहेत आणि त्यांनी या महिलांना लाखो-कोट्यावधी रूपये दिले आहेत. डॉन जुआन स्वत:ला स्पॅनिस प्लेबॉयसारखं सादर करत होते. (हे पण वाचा : कोरोना काळात २ हजार सेक्स स्लेवसोबत होता किम जोंग उन, 'या' महिलेने केला खळबळजनक दावा!)

नोजाकी वाकायामा हे आपल्या घरात मृत आढळून आले होते. पोलिसांनी प्रकरणाची चौकशी केली तर समोर आलं की, त्यांना विष देऊन मारण्यात आलंय. तसेच ही सुसाइड केस नाही. पोलिसांनी सांगितले की, मृत्युआधी नोजाकी आपल्या पत्नीसोबत डीनर करत होते. पोलिसांनुसार, सुडोने इंटरनेटवर विषारी ड्रग्सबाबत माहिती शोधली होती आणि ते आपल्या पतीला दिलं होतं.

या प्रकरणी पोलिसांनी सांगितले की, हे अजून स्पष्ट होऊ शकलं नाही की, या महिलेने आपल्या पतीला कार मारलं. पण हे स्पष्ट आहे की, नोजाकीने आपल्या मृत्युपत्रात म्हटलं होतं की, ते त्यांची १.३ बिलियनची प्रॉपर्टी शहराच्या विकासासाठी दान करतील. (हे पण वाचा : बोंबला! चीनमध्ये महिला त्यांच्या पतींना खाऊ घालत आहेत नपुंसक होण्याचं औषध, पण का भौ?)

नोजाकी यांनी आपल्या ऑटोबायोग्राफीमध्ये लिहिले होते की, त्याचा पैसा कमावण्याचा एक मुख्य उद्देश हा आहे की, त्याला आकर्षक महिलांना डेट करायचं आहे. हे त्यांचं पैसा कमावण्याचं मोटिवेशन होतं. रिपोर्ट्सनुसार, नोजाकीने सपोरो येथे राहणारी सुडोला विचारले होते की, तुला माझ्या आयुष्यातील अखेरची महिला होणं आवडेल का?

स्थानिक मीडियानुसार, सुडोने या नात्याला होकार दिला होता. पण तिने ही बाब तिच्या घरी सांगितली नव्हती. तिने घरातील लोकांपासून नोजाकीसोबतचं नातं लपवून ठेवलं होतं. ती घरच्या लोकांनी सांगत होती की, ती स्टॉक ट्रेडिंगच्या माध्यमातून चांगला पैसा कमावत आहे. 

टॅग्स :JapanजपानJara hatkeजरा हटकेCrime Newsगुन्हेगारी