बोंबला! चीनमध्ये महिला त्यांच्या पतींना खाऊ घालत आहेत नपुंसक होण्याचं औषध, पण का भौ?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2021 02:54 PM2021-04-28T14:54:50+5:302021-04-28T14:56:53+5:30

ग्लोबल टाइम्सच्या रिपोर्टनुसार, चीनमधील महिला त्यांच्या पतींना गपचूपपणे अशाप्रकारचं औषध देत आहेत ज्याने ते नपुंसक होतील आणि दुसऱ्या महिलांच्या मागे लागणार नाहीत

Chinese wives feed their unfaithful husbands impotence inducing medicine stirring health and legal concerns | बोंबला! चीनमध्ये महिला त्यांच्या पतींना खाऊ घालत आहेत नपुंसक होण्याचं औषध, पण का भौ?

बोंबला! चीनमध्ये महिला त्यांच्या पतींना खाऊ घालत आहेत नपुंसक होण्याचं औषध, पण का भौ?

Next

चीनमध्ये पतींकडून होणाऱ्या चिंटींग रोखण्यासाठी महिलांनी एक नवी आयडिया शोधून काढली आहे. ही आयडिया ऐकून सगळेच हैराण झाले आहेत. पार्टनरने त्यांना दगा देऊ नये आणि दुसऱ्या महिलांच्या मागे लागू नये म्हणून काही महिला त्यांच्या पतींना काही औषधं देत आहेत. ही काही सामान्य औषध नाही तर पुरूषांना नपुंसक बनवणारं औषध आहे. ग्लोबल टाइम्सच्या रिपोर्टनुसार, चीनमधील महिला त्यांच्या पतींना गपचूपपणे अशाप्रकारचं औषध देत आहेत ज्याने ते नपुंसक होतील आणि दुसऱ्या महिलांच्या मागे लागणार नाहीत.

ग्लोबल टाइम्सनुसार, एका लेखातून समोर आले आहे की काही चीनी महिला त्यांच्या पतींच्या लपून त्यांना डायथाइलस्टीलबेस्ट्रोल देत आहेत. असे सांगितले जात आहे की, हे औषध एकप्रकारचं सिंथेटिक एस्ट्रोजन आहे ज्याने पुरूषांचं इरेक्शन होत नाही. याबाबतच्या अनेक गोष्टी चीनमधील सोशल मीडियात व्हायरल झाल्या आहेत. (हे पण वाचा : हसू आल्यावर आपोआप बेशुद्ध पडते ही महिला, दोन दुर्मीळ आजारामुळे झाली हैराण!)

WeChat वर प्रकाशित एका लेखानुसार, काही महिलांनी ऑनलाइन औषधे ऑर्डर केलीत. गुप्तपणे जेवण किंवा पेयातून आपल्या पतींना दिलं. असे सांगितले जात आहे की, हे औषध खाल्ल्यानंतर काही दगाबाज पतींनी आपल्या पत्नीला दगा देणं बंद केलं. या लेखात काही महिलांच्या प्रतिक्रियाही घेण्यात आल्या. यातील एका महिलेने हे औषध फायदेशीर असल्याचं सांगितलं. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनकडून या औषधाचं नाव कार्सिनोजन असल्याचं सांगितलं.

एका महिलेने सांगितले की, 'हे औषध मी जसं पतीला देणं सुरू केलं, दोन आठवड्यातच या प्रभाव दिसू लागला होता'. महिलेने दावा केला की, आता तिचा पती घरीच राहतो आणि चांगलाही वागतो. हा लेख सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून औषध गायब झालं आहे. अनेकांनी ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर या औषधाचा शोध घेतला पण कुठेही मिळालं नाही. (हे पण वाचा : एक्स बॉयफ्रेन्डने सोशल मीडियावर केलं ब्लॉक, महिलेने सूड घेण्यासाठी प्रायव्हेट व्हिडीओ त्याच्या मुलीला पाठवले!)

जियाक्सिआंग मॉर्निंग हेराल्डनुसार, काही ठिकाणांवर अजूनही गुप्तपणे पांढऱ्या पावडरच्या रूपात हे औषध विकलं जात आहे. या औषधाला गंध नाही आणि ते लवकर पाण्यात विरघळतं. असे सांगितले जात आहे की, एका दुकानदाराने एका महिन्यात १०० पेक्षा जास्त लोकांना हे औषध विकलं. 

दुकानावर काम करणाऱ्यांनी दावा केला आहे की, हे औषध सामान्यपणे १५ दिवसात आपला प्रभाव दाखवतं. दिलासादायक बाब म्हणजे जसं हे औषध घेणं बंद केलं तर पुरूषाची इरेक्शनची क्षमता सामान्यपणे २१ दिवसात परत येते.
तेच चीनमधील काही कायदेतज्ज्ञाचं मत आहे की, या महिलांनी हे ध्यानात ठेवलं पाहिजे की, त्यांच्या पतीला जर काही शारीरिक हानी झाली तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुद्धा केली जाऊ शकते. असं औषध विकणाऱ्यांवर बंदी घालण्याचाही प्रयत्न केला गेला पाहिजे.
 

Web Title: Chinese wives feed their unfaithful husbands impotence inducing medicine stirring health and legal concerns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.