कोरोना काळात २ हजार सेक्स स्लेवसोबत होता किम जोंग उन, 'या' महिलेने केला खळबळजनक दावा!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2021 10:38 AM2021-04-23T10:38:20+5:302021-04-23T10:49:01+5:30

पार्कने दावा केला होता की कोरोना काळात किम हजार सेक्स स्लेवसोबत होता आणि पृथ्वीवरील स्वर्ग म्हटल्या जाणाऱ्या वॉन्सन कंपाउंडमध्ये क्वारंटाइन होता.

उत्तर कोरियातील ह्युमन राइट एक्विव्हिस्ट येनोमी पार्कला भीती आहे की, उत्तर कोरियाचे सुप्रीम लीडर किम जोंग उन तिची हत्या करू शकतात. मात्र, असं असलं तरी येनोमी त्यांच्या विरोधातील आपला आवाज आणखी मजबूत करत आहे. उत्तर कोरियातील प्रोपोगंडावर ती नेहमीच आपलं मत मांडत आली आहे.

पार्कने २००७ मद्ये मानवी तस्करी करणाऱ्या लोकांना घुस दिली होती आणि या लोकांनी तिला अमेरिकेला पोहोचवलं होतं. पार्कने हा निर्णय घेतला होता कारण किम जोंग उनने तिच्या कॅन्सरग्रस्त वडिलांना भयावह कंस्ट्रेशन कॅम्पमध्ये बंद केलं होतं.

पार्क आता शिकागोमध्ये राहते आणि ती सतत किम जोंग उनचं सत्य लोकांसमोर आणत असते. तिने तिच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले की, उत्तर कोरियाचा सुप्रीमो आपल्यासोबत २ हजार सेक्स स्लेव ठेवतो. पार्कला सतत याची भीती असते की, अमेरिकेत असूनही किम जोंग उन तिची हत्या करू शकतो.

पार्कने दावा केला होता की कोरोना काळात किम हजार सेक्स स्लेवसोबत होता आणि पृथ्वीवरील स्वर्ग म्हटल्या जाणाऱ्या वॉन्सन कंपाउंडमध्ये क्वारंटाइन होता. या महिलांना प्लेजर स्क्वॉड म्हटलं जातं आणि या महिला किम जोंग उनसोबत मनोरंजनासाठी असतात.

पार्क आता जेव्हाही पब्लिक इव्हेंटमध्ये जाते तेव्हा तिच्यासोब गार्ड असतात. सन वेबसाइटसोबत बोलताना तिने सांगितले की, मी गेल्या अनेक वर्षांपासून किम जोंग उनच्या टार्गेट लिस्टमध्ये आहे. मला नेहमीच भीती असते की, त्याची माणसे मला शोधून मारून टाकतील. मला धमक्या मिळत असतात.

ती म्हणाली की, उत्तर कोरियाने मला सार्वजनिकपणे देशाची दुश्मन जाहीर केलं होतं. कारण मी आणि माझी आई देश सोडून पळालो. यामुळे माझ्या परिवाराच्या तीन जनरेशनला तो शिक्षा देत आहे. माझे सर्व नातेवाईक एकतर मारले गेले आहेत किंवा त्यांना तुरूंगात टाकलं आहे.

दरम्यान किम जोंग उनने २०१७ मध्ये त्याचा सावत्र भाऊ किम जोंग नेमची एका एजंटद्वारे हत्या केली होती. ही घटना मलेशियातील एअरपोर्टवर घडली होती. तो नॉर्थ कोरियातील सत्तेवर आपला दावा ठोकू शकत होता म्हणून त्याची हत्या करण्यात आली.

पार्क म्हणाली की, जमाल खरगोशीसाऱख्या ज्येष्ठ पत्रकाराला तुर्कीसारख्या देशात मारण्यात आलं होतं. यावरून हे स्पष्ट होतं की, हुकूमशहा दुसऱ्या देशातही हत्या घडवून आणू शकतो. त्यामुळे मलाही सतत भीती असते.