VIDEO : 'त्या' दुर्घटनेत वडिलांचा मृत्यू झाला अन् मुलानं स्मरण करत दिलं भावूक भाषण, म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2020 07:18 PM2020-01-20T19:18:21+5:302020-01-20T19:20:28+5:30

बुधवारी कॅनडातील ओटावा येथील कार्टन युनिव्हर्सिटीध्ये शोक सभेचं आयोजन करण्यात आलं होतं.

iran plane crash 13 year old ryan pourjam heartbreaking speech after losing his father | VIDEO : 'त्या' दुर्घटनेत वडिलांचा मृत्यू झाला अन् मुलानं स्मरण करत दिलं भावूक भाषण, म्हणाला...

VIDEO : 'त्या' दुर्घटनेत वडिलांचा मृत्यू झाला अन् मुलानं स्मरण करत दिलं भावूक भाषण, म्हणाला...

googlenewsNext

इराण विमान अपघातात मृत्यू झालेल्या वडिलांसाठी 13 वर्षीय मुलानं भावूक भाषण केलं. ते भाषण ऐकून उपस्थितांच्या अक्षरशा डोळ्यात अश्रू तरळले. भाषणादरम्यान, 13 वर्षीय रियाननं इराण विमान दुर्घटनेत मृत्यू झालेल्या मंसूर पौरजम या आपल्या वडिलांची एक मजबूत आणि सकारात्मक व्यक्ती म्हणून आठवण काढली. रियानच्या या भावूक भाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

न्यूज वेबसाइट टुडेच्या माहितीनुसार, बुधवारी कॅनडातील ओटावा येथील कार्टन युनिव्हर्सिटीध्ये शोक सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या शोक सभेला जवळपास 200 हून अधिक लोक उपस्थित होते. यावेळी रियाननं आपल्या वडिलांबद्दल सांगितलं. गेल्या आठ जानेवारीला तेहराननजीक युक्रेनचं विमान कोसळून 176 प्रवासी ठार झाले होते. यामध्ये कॅनडातील जवळपास 57 लोक होते. यात रियानचे वडील मंसूर पौरजम सुद्धा होते. 

हृदयाला चटका लावणाऱ्या भाषणात रियान म्हणाला, "तो क्षण मला कधीच आठवत नाही. माझे वडील मंसूर यांच्या बोलण्यात किंवा त्यांच्या कार्यात कोणतीच नकारात्मकता नव्हती. मी चुकीच्या गोष्टींबाबत बोलणार नाही. कारण मला माहीत आहे की, जर माझे वडील जिवंत असते आणि इतर कोणाचा तरी दुर्घटनेत मृत्यू झाला असता तर त्यांनी सुद्धा भाषणात चुकीच्या गोष्टी केल्या नसत्या. मी सुद्धा करणार नाही." 

दरम्यान, रियानचे वडील मंसूर पौरजम कॅनडातील ओटावामध्ये एक डेंटल क्लिनिकमध्ये काम करत होते. तेहरामध्ये त्यांचे बालपण गेले. त्यानंतर कॅरलटन महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी कॅनडात आले होते. 

Web Title: iran plane crash 13 year old ryan pourjam heartbreaking speech after losing his father

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.