iran man with water phobia not taken bath since 67 years eats animal rotton meat | काय म्हणता... ६७ वर्षांपासून आंघोळही केली नाही, जगातील सर्वात घाणेरडी व्यक्ती म्हणून आहे ओळख

काय म्हणता... ६७ वर्षांपासून आंघोळही केली नाही, जगातील सर्वात घाणेरडी व्यक्ती म्हणून आहे ओळख

ठळक मुद्देत्यांचं वय ८७ वर्ष असून त्यांनी ६७ वर्षांपासून आंघोळ केली नाही. ओमी हाजी असं आहे त्या व्यक्तीचं नाव

सोशल मीडियावर अनेक किस्से व्हायरल होत असतात. त्यांच्यावर विश्वास ठेवायचा की नाही असा प्रश्नदेखील आपल्याला पडतो. इंटरनेटवर अेकदा निरनिराळ्या प्रकारच्या फोबियामुळे काही व्यक्ती घाबरत असल्याचं पाहिलं किंवा वाचलंही असेल. कोणाला उंचीची भीती वाटते, कोणाला आगीची भीती वाटते तर कोणाला आणखी कोणत्या गोष्टीची. फोबियामुळे व्यक्ती या गोष्टींपासून लांबच राहण्याचा प्रयत्न करतात. आज आपण अशा व्यक्तीबाबात माहिती घेणार आहोत ज्या व्यक्तीनं गेल्या ६७ वर्षांपासून आंघोळचं केली नाही. 

ओमी हाजी असं या व्यक्तीचं नाव आहे. त्यांचं वय ८७ वर्षे असून गेल्या ६७ वर्षांपासून त्यांनी आंघोळ न करताच आपलं आयुष्य जगलं आहे. ओमी हाजी हे ईराणमध्ये राहतात. ज्यावेळी स्थानिक माध्यमांनी त्यांना काही प्रश्न विचारले त्यावेळी त्यांना असलेल्या फोबियाबद्दल माहिती समोर आली. आपल्याला पाण्याची भीती वाटते. त्यामुळे आंघोळ करणं तर दूर आपण पाण्याच्या जवळपासही भटकत नाही, असं त्यांनी सांगितलं. 

माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार त्यांनी गेल्या ६७ वर्षांपासून आपलं शरीर साफदेखील केलेलं नाही. जर आपण आंघोळ केली तर आपण आजारी पडू अशी भीती त्यांना वाटते. इतकंच काय तर त्यांचं खाणंही सामान्य व्यक्तींच्या अगदी विरोधातलं आहे. ते खाण्यात केवळ जनावरांचं सडकं मांसच खातात. ते अनेकदा पॉर्कुपाइनचं मांस खातात. तर कधीकधी एकाच वेळ पाच सिगारेटही ओढतात. ओमी हे अनेकदा त्यांच्याकडे असलेल्या जुन्या पाईपद्वारे जनावरांच्या अंगावरचा मळ जाळून सिगारेटसारखं ओढतात. हाजी हे दिवसातून पाच लीटर पाणी पितात. थंडीच्या दिवसांमध्ये ते आपल्या डोक्यावर हेलमेट परिधान करून आपलं शरीर गरम ठेवण्याचा प्रयत्न करतात. तर अनेकादा ते त्यांचे केस वाढल्यानंतर जाळून छोटे करत असतात. त्यांच्या आयुष्यात अशा काही गोष्टी घडल्या त्यामुळे ते असे वागू लागले आहेत. त्यांना जगातील सर्वात घाणेरडी व्यक्ती असं संबोधलं जातं. परंतु ते याकडेदेखील दुर्लक्ष करतात.
 

Web Title: iran man with water phobia not taken bath since 67 years eats animal rotton meat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.