सुर्यावर उठणाऱ्या वादळाचा इंटरनेटवर परिणाम, शास्त्रज्ञांनी दिला इशारा...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2021 07:08 PM2021-09-10T19:08:34+5:302021-09-10T19:12:30+5:30

NASA news: नासाने सांगित्यानुसार, सुर्यावरील वादळामुळे पृथ्वीबाहेरील तापामानात प्रचंड वाढ होऊ शकते.

internet could be affected by heavy storm on sun | सुर्यावर उठणाऱ्या वादळाचा इंटरनेटवर परिणाम, शास्त्रज्ञांनी दिला इशारा...

सुर्यावर उठणाऱ्या वादळाचा इंटरनेटवर परिणाम, शास्त्रज्ञांनी दिला इशारा...

googlenewsNext

नवी दिल्ली: पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र मानवाचे सुर्यापासून येणाऱ्या धोकादायक किरणोत्सर्गापासून संरक्षण करते. पण, आता शास्त्रज्ञांचा असा दवा केलाय की, सुर्यावरील वादळांचा आपल्या उपग्रहावर मोठा परिणाम पडू शकतो. यामुळे इंटरनेटसह काही तंत्रज्ञानावर मोठा परिणाम पडण्याची शक्यता आहे.

सौर वादळे कशी येतात?

अमेरिकेतील अंतराळ संस्था 'नासा'ने सांगिल्यानुसार, सर्वसाधारणपणे सौर वादळे 10-20 दशलक्ष मैल प्रती तास वेगाने फिरतात. ते सुर्याच्या कोरोनल होल्समधून उत्पन्न होतात. याशिवाय, सुर्यप्रकाशाच्या स्फोटामुळे कोरोनल मास इजेक्शनदेखील होऊ शकते. तसेच, सौर वाऱ्यांसह आपल्या जवळच्या ताऱ्यातून बाहेर पडणारे विकिरण पृथ्वीवर येतात. हे चार्ज कण अवकाशात प्रवास करतात आणि अत्यंत वेगाने पृथ्वीच्या दिशेने येतात. पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रात आल्यानंतर प्रचंड उर्जा प्रकाशाच्या स्वरुपात सोडली जाते. त्याला 'औरा' असेही म्हणतात.

पृथ्वीचे बाह्य वातावरण गरम होऊ शकते

शास्त्रज्ञांच्या मते, या सुर्यावरील वादळांचा परिणाम उपग्रहावर आधारित तंत्रज्ञानावर होऊ शकतो. तसेच, सौर वादळामुळे पृथ्वीचे बाह्य वातावरण गरम होऊ शकते. याचा परिणाम जीपीएस नेव्हिगेशन, मोबाईल फोन सिग्नल आणि टीव्हीच्या सिग्लनमध्ये होऊ शकतो. याशिवाय विजेचा प्रवाह वाढून ट्रान्सफॉर्मर जळू शकते. 1859 आणि 1921 मध्ये अशा वादळांचा प्रभाव पृथ्वीवर दिसला होता. 1859 मध्ये सर्वात शक्तिशाली भू-चुंबकीय वादळाने युरोप आणि अमेरिकेत टेलिग्राफ नेटवर्क नष्ट केलं होतं. याशिवाय 1989 मध्ये कमी तीव्रतेचे सौर वादळ आले होते.

Web Title: internet could be affected by heavy storm on sun

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.