पाहिली तर अनेकदा असतील, पण सिलेंडरच्या खालच्या भागात गोल छिद्र का असतात माहीत नसेल; पाहा कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 17:12 IST2026-01-28T16:58:43+5:302026-01-28T17:12:18+5:30
Interesting Facts: सिलेंडरच्या खालच्या भागात काही छिद्र दिलेली असतात. पण ते कशासाठी असतात हे आपल्याला माहीत नसतं. तेच आज आपण जाणून घेणार आहोत.

पाहिली तर अनेकदा असतील, पण सिलेंडरच्या खालच्या भागात गोल छिद्र का असतात माहीत नसेल; पाहा कारण
Interesting Facts: किचनमधील गॅस सिलेंडर किती महत्वाचं असतं हे आपण सगळ्यांना माहीत आहे. हे लाल रंगाचं सिलेंडर आपण रोजच बघतो, पण त्याबाबत काही गोष्टींकडे आपण अजिबात लक्ष देत नाही किंवा त्यांचा विचार करत नाही. सिलेंडरबाबतची अशीच एक गोष्ट म्हणजे सिलेंडरमधील छिद्र. सिलेंडरच्या खालच्या भागात काही छिद्र दिलेली असतात. पण ते कशासाठी असतात हे आपल्याला माहीत नसतं. तेच आज आपण जाणून घेणार आहोत.
सिलेंडर लाल रंगाचे का असतात?
सिलेंडरच्या खालच्या भागात काही छिद्र का दिलेली असतात, त्याआधी आपण घरी वापरलं जाणारं सिलेंडर लाल रंगाचं का असतं? हे जाणून घेऊ. लाल रंग हा जगभरात धोका, इशारा आणि सतर्कता याचं प्रतीक मानला जातो. एलपीजी गॅस ज्वलनशील असल्यामुळे सिलेंडर लाल रंगाचा ठेवला जातो, जेणेकरून तो दूरूनही लगेच ओळखता येईल आणि लोक सावध राहतील. दुसरं कारण म्हणजे लाल रंग उठावदार असल्यामुळे अंधुक प्रकाशात, गोदामात किंवा अपघाताच्या वेळी सिलेंडर पटकन लक्षात येतो. यामुळे आपत्कालीन परिस्थितीत वेळ वाचतो. तसेच ज्वलनशील पदार्थांसाठी लाल रंग वापरण्याची पद्धत आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्य आहे. त्यामुळे गॅस सिलेंडर, फायर एक्स्टिंग्विशर यांसारख्या वस्तू लाल रंगाच्या असतात.
सिलेंडरखाली छिद्र का असतात?
हवा खेळती ठेवण्यासाठी
या छिद्रांमुळे सिलेंडरखाली हवा खेळती राहते. त्यामुळे आत उष्णता साचत नाही आणि तापमान नियंत्रित राहते. खासकरून उन्हाळ्यात यामुळे आतला दाब वाढण्याचा धोका कमी होतो.
ओलावा आणि गंज टाळण्यासाठी
सिलेंडर थेट जमिनीवर ठेवला असता खाली ओलावा साचू शकतो. या छिद्रांमधून हवा फिरत राहिल्याने ओलावा लवकर सुकतो आणि गंज लागण्यापासून संरक्षण मिळते.
फ्लोअरवर डाग पडू नयेत म्हणून
गंज लागल्यामुळे सिलेंडरखालील फरशीवर डाग पडू शकतात. छिद्रांमुळे ओलावा साचत नाही, त्यामुळे फरशीचेही नुकसान होत नाही.
विस्फोटाचा धोका कमी करण्यासाठी
गंजामुळे सिलेंडर कमकुवत होऊ शकतो, ज्यामुळे गॅस गळती किंवा स्फोटाचा धोका वाढतो. हवा खेळती राहिल्याने आणि गंज टाळल्याने हा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो.