कमालच...! १० वर्षांपासून चपाती - भाजीचं पारंपारिक जेवण केलं बंद, फक्त पानं खाऊन जगतोय 'हा' माणूस
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 13:25 IST2026-02-10T13:18:38+5:302026-02-10T13:25:36+5:30
Interesting Facts : या व्यक्तीने दावा केला आहे की, या अनोख्या जीवनशैलीची शिकवण त्याला जंगलात राहणाऱ्या माकडांकडून मिळाली. या अनुभवाने त्याचं पूर्ण जीवन बदलून गेलं आहे.

कमालच...! १० वर्षांपासून चपाती - भाजीचं पारंपारिक जेवण केलं बंद, फक्त पानं खाऊन जगतोय 'हा' माणूस
Interesting Facts : जिवंत राहण्यासाठी म्हणा की, पोट भरण्यासाठी म्हणा मनुष्यांना वेगवेगळी धान्य, डाळी आणि भाज्या खाव्या लागतात. या गोष्टींशिवाय शरीर फिट आणि निरोगी राहू शकत नाही. आपल्या रोजच्या आहारात चपाती, भात, डाळी यांचा समावेश असतो. पण एका व्यक्तीने या विचाराला खोटं ठरवलंय. त्याने अनेक वर्षांपासून कोणतंही धान्य किंवा पारंपारिक जेवण केलेलं नाही. तो पूर्णपणे पाला-पाचोळा आणि जडी-बुटी खाऊन जीवन जगत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे बऱ्याच वर्षांपासून तो आजारी पडला नाही आणि ना त्याला डॉक्टरकडे जाण्याची वेळ आली. या व्यक्तीने दावा केला आहे की, या अनोख्या जीवनशैलीची शिकवण त्याला जंगलात राहणाऱ्या माकडांकडून मिळाली. या अनुभवाने त्याचं पूर्ण जीवन बदलून गेलं आहे.
बुदन खान होसमानी सांगतात की, त्यांनी ही जीवनशैली जंगलातील माकडांकडे बघून स्वीकारली. ते नेहमीच बघत होते की, माकड कोणतंही शिजवलेलं अन्न न खाताही केवळ पानं किंवा फळं खाऊन सक्रिय राहतात. जिज्ञासेपोटी त्यांनीही काही पानं खायला सुरूवात केली. हळूहळू त्यांना पानांची टेस्ट आणि त्यांचा प्रभाव आवडू लागला. त्यानंतर त्यांनी चपाती, भात आणि इतर पारंपारिक जेवण पूर्णपणे सोडलं. पुढे त्यांचा विश्वास निसर्गावर वाढला आणि आज ते पूर्णपणे झाडांची पानं आणि जडीबुटींवर अवलंबून राहतात. ते सांगतात की, हा बदल अचानक झाला नाही, त्यांनी विचारपूर्वक हा निर्णय घेतला.
१५० पेक्षा जास्त पानांचा आहार
बुदन खान यांच्यानुसार, ज्या डोंगरावर ते राहतात तिथे १५० ते २०० वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती आढळतात. ते दिवसातून साधारण सहा वेळा वेगवेगळी पानं खातात. ते सांगतात की, ही पानं टेस्टला गोड असतात आणि ती खाल्ल्यानंतर बराच वेळ पोट भरलेलं राहतं. पण जेव्हा ते गावाला जातात, तेव्हा कमी प्रमाणात चहा किंवा सूप घेतात. मात्र, त्यांचा मुख्य आहार ही पानंच असतात. त्यांचं मत आहे की, निसर्गाने प्रत्येक गरजेचं समाधान स्वत:त लपवून ठेवलं आहे.
१० वर्षांपासून कोणताही आजार नाही
बुदन खान यांचा दावा आहे की, गेल्या १० वर्षात ते एकदाही आजारी पडले नाहीत. त्यांना हॉस्पिटलला जाण्याची गरज पडली नाही आणि त्यांनी कधी औषधही घेतलं नाही. सामान्यपणे मानवी शरीराला ऊर्जेसाठी कार्बोहायड्रेट, प्रोटीन आणि फॅटची गरज असते, ही तत्व धान्य आणि इतर पदार्थांमधून मिळतात. अशात केवळ पानं खाऊन निरोगी आणि फिट राहणं मेडिकलच्या विश्वाला अचंबित करणारं आहे. एक्सपर्टनुसार, हा संशोधनाचा विषय होऊ शकतो. शहराच्या धावपळीपासून दूर, निसर्गाच्या सानिध्यात राहून बुदन खान एकट्याने जीवन जगण्यालाच खरा आनंद मानतात.