आकाशात उडत्या विमानाचे सगळे इंजिन फेल झाले तर काय होईल? पाहा या खतरनाक प्रश्नाचं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2026 16:50 IST2026-01-27T16:30:21+5:302026-01-27T16:50:56+5:30

Airplane Facts: जर अचानक आकाशात उडत असलेल्या विमानाचे सगळे इंजिन फेल झाले तर काय होईल? पाहा नेमकं काय होईल.

Interesting Facts : If plane engines failed in the sky then what would happened know answer | आकाशात उडत्या विमानाचे सगळे इंजिन फेल झाले तर काय होईल? पाहा या खतरनाक प्रश्नाचं उत्तर

आकाशात उडत्या विमानाचे सगळे इंजिन फेल झाले तर काय होईल? पाहा या खतरनाक प्रश्नाचं उत्तर

Airplane Facts: विमानाबाबतच्या अनेक इंटरेस्टिंग गोष्टी नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतात. सध्या विमानाच्या इंजिनाबाबत चर्चा सुरू आहे. बऱ्याच लोकांना असाही प्रश्न पडत असतो की, विमान एका इंजिनाच्या मदतीने लांबचं अंतर पार करू शकतं का? तर यावर नेवादा विश्वविद्यालयातील प्रोफेसर आणि माजी पायलट डेनिअल बब यांनी सांगितलं की, कमर्शिअल विमान असे डिझाइन केले जातात की, ते केवळ एक इंजिनाच्या मदतीने सहजपणे उडू शकतात आणि सुरक्षित लॅंडिंगही करू शकतात. मुळात उड्डाण घेत असताना विमानाला सगळ्यात जास्त एनर्जीची गरज पडते, पण एकदा का विमान हवेत स्थिरावलं, तेव्हा त्याला कमी एनर्जी लागते.

जर हवेतच विमानाच्या एका इंजिनाने काम करणं बंद केलं, तर दुसरं इंजिन इतकं शक्तीशाली असतं की, ते विमानाला पुढील एअरपोर्टपर्यंत सुरक्षित पोहोचवू शकतं. पायलट्सना अशा स्थितीसाठी विशेष प्रशिक्षणही दिलं जातं.

उडत्या विमानाचे सगळे इंजिन फेल झाले तर काय?

या स्थितीची कल्पना करणं म्हणजे एखाद्या वाईट स्वप्नासारखंच वाटू शकतं. पण विज्ञान हे सांगतं की, इंजिन फेल होण्याचा अर्थ हा नाही की, विमान एखाद्या दगडासारखं खाली येऊन आदळेल. डेनिअल बब सांगतात की, विमानात ग्लाइड करण्याची म्हणजेच हवेत तरंगण्याची क्षमता असते. मोठे कमर्शिअल विमान इंजिनाशिवायही अनेक मैलाचा प्रवास करू शकतात. एका ठराविक उंचीवर उडत असलेलं विमान इंजिन बंद पडल्यावरही जवळपास २० ते ३० मिनिटांपर्यंत हवेत राहू शकतं, ज्यामुळे पायलटला सुरक्षित स्थान शोधण्यासाठी वेळ मिळतो.

इमरजन्सी लॅंडिंगसाठी पुरेसा वेळ

जेव्हा विमान एका ठराविक उंचीवर उडत असतं आणि तेव्हा अचानक इंजिन बंद पडलं तर पायलटकडे स्थिती सांभाळण्यासाठी पुरेसा वेळ असतो. विमान लगेच खाली पडत नाही, उलट ते हळूहळू खाली येतं. यादरम्यान पायलट विमानाच्या कंट्रोलचा वापर करून ते जवळच्या रनवेवर किंवा एखाद्या सपाट जागेवर लॅंड करू शकतात. इतिहासात अशी अनेक उदाहरणं आहे, ज्यात पायलटने इंजिन फेल झाल्यावरही विमान यशस्वीपणे ग्लाइड करत शेकडो प्रवाशांचे जीव वाचवले.

विमानाचा इतिहास आणि टेक्नीक हे सिद्ध करते की, विमानाने प्रवास करणं खूप सुरक्षित असतं. सुरक्षा प्रणाली आता इतकी डेव्हलप झाली आहे की, कोणत्याही यांत्रिक बिघाडाचा एक बॅकअप तयार असतो. त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा विमानातून कडाडणाऱ्या विजा बघाल किंवा आकाश बघाल तर हे लक्षात ठेवा की, ज्या विमानात आपण बसले आहात, ते कोणत्याही आव्हानासाठी तयार आहे.

Web Title : विमान के इंजन फेल होने पर क्या होता है? जवाब जानिए।

Web Summary : व्यावसायिक विमान एक इंजन से सुरक्षित रूप से उड़ान भर सकते हैं और उतर सकते हैं। इंजन फेल होने पर भी, विमान ग्लाइड कर सकते हैं, जिससे पायलटों को सुरक्षित लैंडिंग की जगह खोजने का समय मिल जाता है। आपातकालीन लैंडिंग संभव हैं; पायलट प्रशिक्षण और बैकअप सिस्टम यात्रियों की सुरक्षा सुनिश्चित करते हैं।

Web Title : What happens if a plane's engines fail? The answer.

Web Summary : Commercial planes can fly and land safely with one engine. Even with total engine failure, planes can glide for miles, allowing pilots time to find a safe landing spot. Emergency landings are possible; pilot training and backup systems ensure passenger safety.