शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
3
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
4
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
5
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
6
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
7
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
8
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
9
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
10
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
11
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
12
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
13
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
14
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
15
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
16
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम
17
एक अंध तर दुसरा अपंग, तरीही मिळून तिसऱ्याला संपवलं! घटना ऐकून पोलीसही झाले स्तब्ध
18
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...
19
बाजाराचा २ महिन्यांचा उच्चांक! गुंतवणूकदारांची १.२३ लाख कोटींची कमाई, 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर
20
पुढील माहिती मिळेपर्यंत नेपाळला जाऊ नका; सरकारने भारतीयांसाठी सूचना दिल्या

प्रेरणादायी! वडिलांच्या अश्रूंनी ओसाड प्रदेशात फुलली हिरवळ, कन्याजन्मानंतर लागतात १११ झाडं

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 13:06 IST

महाराष्ट्रातून प्रेरणा, राजस्थानमधील दुष्काळाला हरवले, बहिणींची पहिली राखी झाडांना; गोष्ट तीव्र दुष्काळाचा डाग पुसणाऱ्या पिपलांत्री गावाची

महेश घोराळे

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: राजस्थानच्या राजसमंद जिल्ह्यातील चार हजार लोकसंख्येचे पिपलांत्री गाव, कधी काळचा दुष्काळ आणि प्रदूषणामुळे येथील लोक गाव सोडून जात असत. पण, २० वर्षांपूर्वी एक व्यक्ती परिवर्तनाच्या दृढनिश्चयाने सरपंच होऊन पुढे येतो. मुलीच्या स्मरणार्थ एक झाड लावून ही हिरवी वाट धरतो. याच वाटेवर आज प्रत्येक मुलीच्या जन्मानंतर गावात १११ देशी वृक्षांची लागवड होते. महाराष्ट्रातील पाणीदार गावांकडून प्रेरणा घेऊन या गावाने ४ लाखांहून अधिक झाडे जगवली व ओसाड जमिनीवर हिरवे स्वप्न फुलविले. 

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पिपलांत्रीचे माजी सरपंच, तथा समाजसेवक पद्मश्री डॉ. श्याम सुंदर पालिवाल यांनी लोकमतला सांगितले की, परिसरातील खाणींमुळे पर्यावरणाच्या विविध समस्यांनी घेरलेल्या गावात मी सरपंच म्हणून निवडून आलो. २००५ पासून ओसाड गावचा हिरव्या वाटेवरचा प्रवास सुरू झाला. खाणींवर नियंत्रण, जलसंधारण मोहीम, वृक्षलागवड आदी कामे हाती घेऊन श्रमदानातून ती पूर्ण केली.

लेकीच्या स्मरणात पहिलं रोप

२००७ मध्ये पालीवाल यांच्या मुलीचा डिहायड्रेशनमुळे मृत्यू झाला. त्यांनी कुरणात मुलीच्या स्मृतीप्रित्यर्थ एक रोप लावले. या भावनिक प्रसंगात अश्रू दाटलेले गाव एकत्र झाले. या एका रोपासाठी गावाच्या भावना जागृत होऊ शकतात, तर या विधायक कामासाठी गावकऱ्यांना एकत्र आणता येईल, या विचारातून त्यांनी मोहीम हाती घेतली.

महाराष्ट्रातून प्रेरणा

डॉ. पालिवाल यांनी सरपंच झाल्यानंतर महाराष्ट्रातील राळेगण सिद्धी आणि हिवरे बाजार या अहिल्यानगर जिल्ह्यातील आदर्श गावांना भेटी देऊन येथून गावाच्या विकासाची प्रेरणा घेतली. या गावांतील स्वावलंबन, पर्यावरण संवर्धन आणि सामूहिक विकासाची बिजे त्यांनी आपल्या पिपलांत्री गावामध्ये रोवली. भोवतालच्या परिसरात गावकऱ्यांनी श्रमदानातून कडुलिंब, शिसम, आंबा, वड, पिंपळासारखी विविध प्रजातींची लाखो झाडे जगविली. त्यामुळे शुष्क क्षेत्रात वसलेले हे गाव आज  हिरवेगार झाल्याने  राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रशंसा मिळवत आहे.

२० वर्षांपूर्वी खाणींमुळे मलब्याचे पहाड, प्रदूषणामुळे श्वसनाचा त्रास व्हायचा. टँकर, रेल्वेने गावात यायचे पाणी. खोलं भूजल, कोरडी शिवारं अन् हवालदिल शेतकरी अशी स्थिती होती. जैवविविधतेचा ऱ्हास, बेरोजगारी, स्थलांतर व्हायचे. आता स्वच्छतेत गाव आदर्श. जलसंधारणामुळे भूजल वाढले. स्त्री सन्मान, सेंद्रिय शेती, वृक्षारोपणामुळे समृद्धी. गावावर शेकडो लघुपट, सिनेमे येथे तयार होतात. देशविदेशातून भेटीसाठी लोक येतात.

दरवर्षी झाडांचा उत्सव

गावात १११ झाडे लावण्याची प्रथा निरंतर सुरूच असून, प्रत्येक रक्षाबंधनाला येथे पर्यावरणाचा अनोखा उत्सव जल्लोषात साजरा करण्यात येतो. गावातील मुली आपल्या भावंडांप्रमाणे वाढविलेल्या झाडांना राखी बांधून त्यांच्या रक्षणाची प्रतिज्ञा करतात. पालकही लावलेल्या झाडांची देखभाल करण्याचे आणि मुलींना शिक्षण देण्याचे वचन देतात.

गावात जलसंरक्षण, वृक्षारोपण, शिक्षण, आत्मनिर्भरता, स्वच्छता, आदी विविध क्षेत्रांत आम्ही काम केले. लाखोंच्या संख्येने परिसरात झाडे वाढविली आहेत. येथून प्रेरणा येऊन विविध देशांतील लोक आपापल्या गावात काम करीत आहेत.-डॉ. श्याम सुंदर पालिवाल, माजी सरपंच, पिपलांत्री

टॅग्स :Rajasthanराजस्थान