शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाला एवढ्या जागा, केंद्रात सत्ताबदल होण्याची दाट शक्यता; पृथ्वीराज चव्हाणांचा महाराष्ट्रावर काय अंदाज...
2
लोकसभेनंतर कर्नाटकात ऑपरेशन नाथ, काँग्रेस सरकार कोसळणार? एकनाथ शिंदेंचा दावा, सिद्धरामय्यांची प्रतिक्रिया
3
'घोटाळ्याच्या चौकशीसाठी भुजबळांनी...';राऊतांचे मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप, थेट मोदींना लिहीलं पत्र
4
पेट्रोल भरायला आला अन् काळाने घात केला; घाटकोपर दुर्घटनेत युवकाचा दुर्दैवी अंत
5
EPFO ची कोट्यवधी लोकांसाठी गूड न्यूज! घर, लग्न, आजार, शिक्षणासाठी ऑटो क्लेम सोल्युशन लाँच; पाहा
6
पीओकेमधील गोंधळामुळे पाकिस्तान सरकारने गुडघे टेकले! २३ अब्ज रुपयांचा निधी जाहीर
7
LICची लखपती स्कीम! केवळ रोज ₹४५ रुपये जमा करून मिळवू शकता ₹२५ लाख; पाहा संपूर्ण डिटेल
8
काशी-वाराणसीतील मराठी समाज मोदींच्या पाठिशी; रोड शोमध्ये पंतप्रधानांचं मराठमोळं स्वागत
9
कोणताही मूर्ख माणूस असा उघडपणे बॅगा घेऊन पैसे वाटप करू शकतो का? राऊतांच्या दाव्यांवर शिंदे गटाचे प्रत्युत्तर
10
ईशा गुप्ताने केले आहेत Eggs Freeze, म्हणाली- "मी आज ३ मुलांची आई असते, पण..."
11
'कदम, दरेकर भाजपामध्ये गेल्यावर तोंडात दात नव्हते का?, सुषमा अंधारेंचा राज ठाकरेंवर पलटवार
12
बेपर्वाईचे १४ बळी,७८ जखमी; घाटकोपरला पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळले, अवकाळी पावसाचा तडाखा
13
आजचे राशीभविष्य १४ मे २०२४; सूर्य वृषभेत, दलाली, व्याज, कमिशनमधून मोठ्या धनलाभाची शक्यता
14
महामुंबईला अवकाळीचा तडाखा; मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई, रायगड, पालघरला पावसाने झोडपले
15
राज्यभरातील होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करा: CM एकनाथ शिंदे, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
16
“मुझे बचाव, मैं शेड के नीचे फस गया हूँ”; होर्डिंगखाली दबलेल्या जखमीची सुटका
17
...तर पाकला हातात बांगड्या घालायला लावू! अणुशक्तीवरुन इंडिया आघाडीवर PM मोदींचा घणाघात
18
महाराष्ट्रात टक्का वाढेना; देशातील ९६ मतदारसंघात सरासरी ६६ टक्के मतदान
19
सावत्र लेक दिया मिर्झाला म्हणत नाही आई, अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली- "ती मला..."
20
प्रश्न: विवाह कधी करणार? राहुल गांधी म्हणाले, आता लवकरच करावा लागेल...

लय भारी! डिलिव्हरी बॉय बनून स्वप्न पूर्ण केलं, हजारोंना विकली जातेय 'त्या' नं बनवलेली सायकल 

By manali.bagul | Published: October 06, 2020 7:59 PM

शेतकऱ्यांसाठी आतापर्यंत अनेक वेगवेगळी मशिन्स तयार केली आहेत. अलिकडे आपल्या मित्रांच्या सहकार्याने इंद्रजीतने मल्टी पर्पज ड्रोन तयार केला आहे.

(Image Credit- NBT)

इच्छा तेथे मार्ग असं तुम्ही पहिल्यापासून ऐकत आला असाल. याचचं उभेउभं उदाहरण असलेल्या तरूणाबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. झारखंडच्या सिंहभूम परिसरातील इंद्रजीत हा पदवीधर विद्यार्थी आहे. लहानपणापासूनच इंद्रजीतला मशिन्सची खूप आवड होती. या आवडीमुळे आतापर्यंत त्याने अनेक अविष्कार त्याने केले आहेत. पर्वतीय भागात मुलांना पायी चालण्यासाठी समस्यांचा सामना करावा लागत होता. हीच समस्या लक्षात घेत इंद्रजीतने सोलर सायकल तयार केली आहे. शेतकऱ्यांसाठी आतापर्यंत अनेक वेगवेगळी मशिन्स तयार केली आहेत. अलिकडे आपल्या मित्रांच्या सहकार्याने इंद्रजीतने मल्टी पर्पज ड्रोन तयार केला आहे.

कोणतीही जागा सॅनिटाईज करण्यासाठी तसंच औषधं डिलिव्हर करण्यासाठी हा ड्रोन फायदेशीर ठरतो. बेटर इंडीयाने दिलेल्या माहितीनुसार इंद्रजीतचे बाबा बस चालक आहेत. आर्थिक स्थिती फारशी चांगली नसल्यामुळे इंद्रजीतच्या भावंडांना सरकारी शाळेत शिक्षण घ्यावे लागत आहे. सुरूवातीपासूनच इंद्रजीत शाळेतील विज्ञान उपक्रमांमध्ये सहभाग घेत होता आणि पाहता पाहता त्याने आपले वर्कशॉप तयार केले. 

तयार केली सोलार सायकल

एकदा इंद्रजीतला सोलार सायकल मिळाली होती. या सायकलचे तंत्र समजून घेऊन त्याने सायकल तयार करायला सुरूवात केली. जवळपास ३ हजार रुपयांमध्ये ही सायकल तयार केली होती. ही सायकल दोन पद्धतीने चालू शकते. सोलार पॅनेलच्या साहाय्याने ही सायकल ३० किमी चालते तर इलेक्ट्रीक चार्जिंगने ६० कमी चालते. आपला अभ्यास आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी कोणतीही आर्थिक मदत मिळत नसल्याने इंद्रजीतने डिलिव्हरी बॉयचे पार्ट टाईम काम करायला सुरूवात केली. दीड हजार वर्ष जुन्या पेटीत बंद होती ममी; अन् उघडल्यावर दिसलं 'असं' काही, पाहा व्हिडीओ

या कामासाठी त्याने स्वतः तयार केलेल्या सोलार सायकलचा वापर करायला सुरूवात केली. एकदा त्याने आपल्या सायकल बनवण्याचा व्हिडीओ युट्यूबवर टाकला आणि ऑर्डर्स मिळायला सुरूवात झाली.  या सायकलची विक्री १४ हजार रुपयांना होत आहे. या सायकलमध्ये २४ वॉल्टची बॅटरी असून आतापर्यंत ८० ऑर्डर्स इंद्रजीतला मिळाल्या आहेत. याशिवाय  अजून एका संशोधनावर काम सुरू आहे.  Video : ऐन गर्दीच्या वेळी अचानक सुपर मार्केटचं सिलिंग कोसळलं; अन्....पाहा थरारक व्हिडीओ

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेInspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी